आत्मविश्वास वाढीसाठी एक दिवस एक रात्र, आई शिवाय राहून मुलांना वैयक्तिक स्वालंबी बनवण्यासाठी सहलीचे आयोजन ... video news
आपला ई पेपर/परळी /प्रतिनिधी
आपण अनेकदा पाहतो लहान मुले अनेक चिमुरडी आपल्या बालपणी आई आणि वडिलांशिवाय राहू शकत नाही प्रत्येक गोष्ट ते आई शिवाय करत नाही.आतापासूनच सर्व मुलांना स्वतःची कामे स्वतः करण्यासाठी उत्तेजित करणे.तसेच त्याबद्द्ल आत्मविश्वास वाढीस लागावा म्हणून एक दिवस एक रात्र आई शिवाय राहून मुलांना वैयक्तिक स्वालंबी बनवण्यासाठी एखाद्या स्वप्नपूर्तीचे कारण होण्यात जगावेगळं सुख आहे आणि आज ते सुख अनुभवले. बचपन स्कूलचा हा एक आगळावेगळा अनोखा उपक्रम तब्बल पाच वर्षापासून राबवल्या जात आहे. अशी माहिती शाळेच्या प्राचार्या सौ. दीपा बाहेती यांनी दिली आहे.
101 चिमुकल्यांची बचपन स्कूलने नुकतीच एक दिवसीय सहल काढली होती. एक रात्र,एका दिवसामध्ये त्यांच्या सगळ्या छोट्या छोट्या गरजेचे वस्तू त्यांनी स्वतःच शोधून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. यात सर्व शिक्षकांनी एक दिवस आईचा भूमिकेत सर्व चिमुकल्यांची देखभाल केली.
सोबतच स्वतः तिकीट खरेदी करून प्रवास करणे, चित्रपट पाहणे मौज मज्जा करणे या गोष्टींचा आनंद घेऊननिसर्ग उद्यानात मन भरून मैदानी खेळांचा बेधुंद आनंद लुटला.
यावेळी बचपन स्कूलच्या वतीने
मुलांसाठी अल्प उपहरामध्ये रात्रीचे दूध नाश्ता जेवण आणि चित्रपटाचे आयोजन केले होते.
घरी आईप्रमाणे मुलांना टीचर्स ने रात्री झोपतेवेळी स्टोरी सुद्धा सांगण्यात आली
थंडीच्या दिवसात शेकोटीची उब हीसुद्धा मुलांनी अनुभवली...
सकाळी उठल्यावर योगासने, स्विमिंग ,विविध स्पर्धां द्वारे खेळ घेण्यात आली,
रात्रीच्या जेवणापासून सकाळच्या नाष्ट्यापर्यंत सर्व गोष्टीचे काटेकोरपणे व शिस्तबद्ध नियोजन याचे सर्वच पालकांनी कौतुक केले.
विद्यार्थ्यांचा मैदानी खेळात सहभाग व आत्मविश्वास वाढवा हा उद्देश समोर ठेवून राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचिव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद,उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे नियोजन करण्यात आले होते.
यावेळी बचपन स्कूल मधील शिक्षिका वैशाली नरवाडकर,दिपाली दहिफळे,शैला,सुरेखा मुंडे,संगिता वाघमारे ,रेखा गुट्टे, मनिषा पाटील,प्रियांका ठोंबरे,शुभांगी आघाव,प्राजक्ता कटके,शिक्षकेतर कर्मचारी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
Social Plugin