Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सर्वच वित्तीय संस्था केवळ ठेवीदारांच्या विश्वासावरच उभी रहाते...

 कोणती संस्था सर्वच ठेवीदारांना एकदमच मुदतपूर्व ठेव रकमा परत देऊच शकत नाही... संयम आवश्यक असतो


मागील दोन महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील काही मल्टीस्टेट पतसंस्थांच्या बाबतीत अफवा सुरु झाल्याने ठेवीदार ठेवी काढण्याचा विचार करीत आहेत. सर्वच वित्तीय संस्था केवळ ठेवीदारांच्या विश्वासावरच उभी रहाते. ठेवींच्या बळावरच गरजवंत कर्जदारांना कर्जाचे वाटप करण्यात येते. 

आलेल्या ठेवीच्या ७० टक्के रक्कम कर्ज स्वरूपात वाटलेली असताना सर्वच ठेवीदारांना एकदमच मुदतपूर्व ठेव रकमा परत देऊच शकत नाही. ही बाब वित्तीय संस्थांशी व्यवहार करणाऱ्यांना नक्कीच माहीती असते. तरीही ठेवीदार जर एकदाच ठेव काढणार असतील तर कोणतीच वित्तीय संस्था ठेवी परत करू शकत नाही. 

कारण कर्जाचे वाटप हे परतफेडीच्या अटींवर केलेले असते. कर्जफेडीसाठी किमान दोन वर्ष ते दहा वर्षा पर्यंतची मुदत असते. त्यामुळे वित्तीय संस्था थकीत कर्जाशिवाय कोणतेही कर्जाची वसुली एकदाच करू शकत नाही. त्यामुळे ठेवीदारांच्या रकमा मुदतपूर्व परत करू शकत नाही. वित्तीय संस्थाची देखील ईतरत्र गुंतवणुक असते. 

या सर्व बाबी लक्षात घेऊन ठेवीदारांनी ठेवी काढण्यासाठी गर्दी न करता संस्था वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेच आहे. कारण मल्टीस्टेट / पतसंस्थेवर अवलंबून असलेल्यांची संख्या मोठी आहे. ज्या संस्थेत ठेवीदार जास्त त्याच पटीत कर्जदार असतात. तेथील कर्मचाऱ्यांचे भविष्य त्यावरच अवलंबून आहे. सर्वात जास्त रोजगार निर्मिती ही मल्टीस्टेट/पतसंस्थेतुन सहजरित्या उपलब्ध होते. त्यामुळे ठेवीदारांनी संयम ठेवल्यास कोणाचाही रुपया बुडणार नाही. संस्था अडचणीत आल्यास ठेवीदार अडचणीत येतील व कर्जदार फायद्यात राहतील. अस घडू नये यासाठी संस्थांना पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे.


ही संस्था आपली आहे, आपल्यासाठीच आहे.

संस्थेने सहकार्य केले, आता आपल्या सह‌कार्याची

संस्थेला नितांत आवश्यकता आहे.

संयम बाळगा, विश्वास ठेवा आपल्या विकाराला

आम्ही कधीही तडा जाऊ दिला नाही

आणि जाऊ देणार नाही.

राजस्थानी नागरी

सह. पतसंस्था मर्या., परळी वैजनाथ.


३५ वर्षापासून कार्यरत संस्था...विश्वास आणि सहकार्य कायम असू द्या...

संस्थेच्या स्थापनेपासूनचा प्रवास आम्हा सर्वांकरिता संघर्षाचा आहे, दरवेळी सकारात्मक मार्ग काढत आमची वाटचाल सुरु आहे. आमच्या पाठीशी असलेल्या परिवारातील एक लाखाहून अधिक सदस्य आम्हाला बँकिंग क्षेत्रातील अत्याधुनिक सेवा-सुविधा देण्याची प्रेरणा देतात. "Contribution of Affection for the Fulfillment of Your Dreams" हा मूलमंत्र डोळ्यासमोर ठेऊन आम्ही नेहमी ग्राहक सेवेसाठी व ग्राहकांसाठी मोठ-मोठी स्वप्न बघितली व ती पूर्ण करण्यासाठी सर्वांनी आम्हाला साथही दिली.

संस्थेच्या प्रवासाबद्दल सांगायचे झाले तर हा प्रवास आमच्यासाठी कसोटीचाच होता व नेहमी राहणार. राजस्थानी मल्टीस्टेट परिवारातील हजारो सदस्यांचा विश्वास, त्यांच्या ठेवींची जबाबदारी, ठेवींवर चांगला परतावा व सुरक्षितता, उत्तम सेवा इ. मध्ये आम्ही व आमचे कर्मचारी कुठे कमी पडू नये याची काळजी येत प्रगतीच्या वाटेवरचा प्रवास सुरु आहे. आम्ही मानतो कि 'आपल्याकडे ठेवी किती वापेक्षा आपल्यावर ग्राहकांचा विश्वास किती' हे महत्वाचे आहे. असाच विश्वास आणि सहकार्य आम्हाला आपल्याकडून या संघर्षाच्या कठीण काळात हवे आहे.

चंदुलाल मो. बियाणी

चेअरमन

जशी खंबीर साथ आजवर देत आला आहात तशीच साथ असू द्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या