आपला ई पेपर परळी
कलशारोहण सोहळा उत्सवात संपन्नयेथील बस स्थानकाच्या आवारातील एस टी कर्मचारी गणपती मंदिरात श्री गणेश व मारुती मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहणाचा सोहळा शुक्रवार दि.10 रोजी उटीब्रह्मचारी येथील निळकंठेश्वरमहादेव मंदिराचे मठाधिपती प.पु.श्री सुरेशजी ब्रह्मचारी महाराज यांच्या शुभहस्ते धार्मिक वातावरणात संपन्न झाला.
बस स्थानकाच्या आवारात असलेल्या सदरील मंदिरातील श्री गणेशा व मारुती हे भक्तांच्या हाकेला धावून येणारे व त्यांचे नवसाला पावणारे असल्याचा भाविकांचा विश्वास आहे. त्यामुळे येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. भाविकांच्या सहकार्याने सदरील मंदिराच्या नूतनीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले अआहे. दोन्ही मूर्तीं अतिशय सुबक असून त्यांच्या प्राणप्रतिष्ठा व मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमाच्या अनुषंगाने बुधवार दि.८ ते शुक्रवार दि. १० नोव्हेंबर दरम्यान मंदिरात विविध धार्मिक पूजा विधी संपन्न करण्यात आले.
शुक्रवार च्या कार्यक्रमात उटीब्रह्मचारी येथील निळकंठेश्वर महादेव मंदिराचे मठाधीपती प.पू.श्री सुरेशजी ब्रह्मचारी महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते दोन्ही मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचे कलशारोहणाचा सोहळा मोठ्या उत्सवात संपन्न झाला. तिन्ही दिवस संपन्न झालेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांत परिसरातील भाविक-भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.प्राणतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रमा नंतर भक्तांना खिचडी व लाडू प्रसाद वाटप करण्यात आला.
*Breaking News|
*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*
*🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*
*🎯👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*
*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*
Social Plugin