Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत रेल्वे स्थानक येथे पालखीचे (जथ्था) चे भाटिया परिवाराकडून स्वागत


शिख धर्माचे संस्थापक धर्मगुरू गुरुनानक देवजी यांची आज जयंती

आपला ई पेपर/परळी / प्रतिनिधी



शिख धर्माचे संस्थापक धर्मगुरू गुरुनानक देवजी यांची येत्या 27 नोव्हेंबर रोजी जयंती साजरी होत आहे. या निमित्ताने नांदेड ते बिदर या विशेष रेल्वे गाडीचे शासनाच्या वतीने दरवर्षी नियोजन करण्यात येते. रविवार, दि.26 ऑक्टोबर रोजी ही जयंती विशेष गाडी परळी वैजनाथ येथे आली असता भाटिया परिवार व मित्र परिवार यांच्या वतीने सर्वांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात आली. याच वेळेस गाडीत असलेले शिख धर्माचे धर्मगुरू यांचा सत्कार करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिख धर्माचे संस्थापक धर्मगुरू गुरुनानक देवजी यांच्या जयंती निमित्त दरवर्षी नांदेड ते बीदर असा पालखी सोहळा संपन्न होत असतो. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा पारंपरिक सोहळा संपन्न होत असून रविवारी या पालखीचे परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन येथे आगमन झाले. पालखीचे आगमन होताच परळीतील भाटिया परिवार आणि मित्र परिवार यांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर या विशेष रेल्वे गाडीतील सर्व प्रवासी भक्त बांधवांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे पालखीचे आगमन होण्यापूर्वी स्वागतासाठी थांबलेल्या भाटिया परिवारातील सदस्य आणि इतर सर्वांनीच स्टेशनची स्वच्छ्ता मोहीम राबवली. पालखी बिदरकडे जातांना जसे स्वागत करण्यात येते, त्याचप्रमाणे पालखी जयंती उत्सव संपन्न झाल्यानंतर परतीचा प्रवास करते. त्याही वेळेस परळी वैजनाथ रेल्वे स्थानक येथे अशाच स्वरूपाची व्यवस्था भाटिया परिवाराच्या वतीने करण्यात येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या