आपला ई पेपर/परळी प्रतिनिधी
देशाच्या संविधान सभेने दि.२६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी संविधानाच्या मसुद्याला मंजुरी दिली होती. या घटनेचे स्मरण करण्यासाठी संविधान दिवस साजरा केला जातो यात अनुषंगाने राजस्थानी पोदार स्कूल येथे आज( दि 26) नोव्हेंबर रविवार रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.
मुंबई येथे 26 /11झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस व जवानांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. सर्व शहिद हुतात्म्यांना विनम्र अभिवादन, करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून परळी शहर पोलीसचे पोहे भताने, वैद्यकीय क्षेत्रातील दंत चिकित्सक डॉ. दिनेश लोढा, सहसचिव धीरज बाहेती, बचपन चा प्राचार्या सौ.दीपा बाहेती, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील, सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख सुशील कटके, परीक्षा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर गुट्टे, यांची उपस्थिती होती.
राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचिव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद,उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने संविधान भारतात अंमलात आले तो दिवस २६ जानेवारी १९५० हा आहे.
भारतात १९४९ पासून दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा केला जातो. देशाच्या संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी संविधानाच्या मसुद्याला मंजुरी दिली होती. या घटनेचे स्मरण करण्यासाठी संविधान दिवस साजरा केला जातो. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने संविधान भारतात अंमलात आले तो दिवस २६ जानेवारी १९५० हा आहे. यामुळे २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि २६ नोव्हेंबरला संविधान दिन (संविधान दिवस) साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजस्थानीज पोदार लर्न स्कूल आणि बचपन स्कूल मधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Social Plugin