Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

डाॅ.संतोष मुंडे यांनी"दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाचे घेतले कामकाज समजुन


मुंबईच्या कार्यालयात अनेकांनी केले स्वागत, दिव्यांगांसाठी आयुष्य खर्ची घालणार डॉ.संतोष मुंडे

आपला ई पेपर मुंबई प्रतिनिधी 

दिव्यांगांच्या सेवेसाठी अभियानचे उपाध्यक्ष हे पद माझ्यासाठी खुप महत्वाचे आहे. पदाला न्याय देण्यासाठी मी वचनबद्ध असुन दिव्यांगांसाठी आयुष्य खर्ची घालणार असल्याचे प्रतिपादन "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले. मुंबईच्या कार्यालयात अधिकारी, कर्मचारी व दिव्यांगांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. 

डॉ.संतोष मुंडे यांनी आज मुंबई येथे दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय मित्तल टॉवर नरिमन पॉईंट येथे  ऑफिसला भेट देऊन कामकाज समजून घेतले. यावेळी दिव्यांग विभागाचे प्रधान सचिव अभय महाजन, आयुक्त घोडके यांनी त्यांचे स्वागत करून कामकाजाचे स्वरूप व उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती दिली. सातत्याने ना. धनंजय मुंडेंच्या यांच्या नेतृत्वाखाली समाजातील दिव्यांग, निराधार, विधवा आदी वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आ.बच्चूभाऊ कडू यांनी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली असल्याचे सांगुन आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत असल्याने आपण समाधानी आहोत असेही ते म्हणाले. गेल्या पंधरा वर्षापासुन मी डॉक्टर व्यवसायाच्या माध्यमातुन सामाजिक कार्यात आहे. दिव्यांगांसाठी काम करताना अनेक अडचणी आल्या पण शेवटच्या दिव्यांगाला न्याय मिळावा ही आपली भूमिका असुन त्यासाठीच आपण काम करत आहोत. नवीन जबाबदारीमुळे आणखी कामाची व्याप्ती वाढून मला जास्तीत जास्त दिव्यांगांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे असे सांगुन या कामामध्ये या विभागातील सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन डॉ. संतोष मुंडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या