आपला ई पेपर/परळी / प्रतिनिधी
राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वार्षिक क्रीडा स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय समितीच्या वतीने सोमवार दि.20 नोव्हेंबर रोजी सकाळी दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेचे सहसचिव धीरज बाहेती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
याकार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. या विविध स्पर्धा मधूनच प्रयत्न व आत्मविश्वास वाढवण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. तसेच विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करताना शालेय जीवनातील आठवणी तर सांगितल्याच त्याचबरोबर मैदानवर विविध खेळ खेळा. निरोगी राहा असा सल्ला यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी दिला
पोदार स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि 20 नोव्हेंबर ते दि 25 नोव्हेंबर पर्यंत या क्रीडा महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले आहे. या वार्षिक क्रीडा महोत्सवात जलतरण स्पर्धा, रनिंग, हॉलीबॉल, थ्रो बॉल,खो-खो, कबड्डी, भालाफेक, गोळाफेक, लांब उडी, उंच उडी अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा मैदानी खेळात सहभाग व आत्मविश्वास वाढवा हा उद्देश समोर ठेवून राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचिव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, सहसचिव धीरज बाहेती, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग,प्राचार्य मंगेश काशीद,उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा सुरू आहेत.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
Social Plugin