Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सिंदफणा पब्लिक स्कूलच्या 19 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

 आपला ई पेपर माजलगाव प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धेत सिंदफणा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी फ्री स्टाइल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, फ्री स्टाइल रिले, वॉटर पोलो या  प्रकारांमध्ये विजयी होत पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले. या यशाबद्दल विद्यार्थी व शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय जलतरण स्पर्धा दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी पार पडल्या. यामध्ये सिंदफणा पब्लिक स्कूलच्या विविध संघांनी यश प्राप्त केले. चौदा वर्षे वयोगटातील मुलांच्या फ्री स्टाइल प्रकारात सुदर्शन बडे याने सुवर्ण तर मानव मेहता या विद्यार्थ्याने बॅकस्टोक या प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. 

याच वयोगटात 4X100 रिले प्रकारात शाळेच्या संघाने सुवर्णपदक मिळविले. मुलींच्या 14 वर्षे वयोगटातील फ्री स्टाइल प्रकारात अक्षरा सोळंके या विद्यार्थिनीने सुवर्ण तसेच मानसी जगताप या विद्यार्थिनीने बॅक स्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात 200 मीटर स्पर्धेत अनुष्का सोळंके हिने रोप्यपदक मिळवले तर 4X100 मुलींच्या फ्री स्टाईल रिले प्रकारात सुवर्ण तर मिडल रिले प्रकारात देखील विद्यार्थिनींनी सुवर्णपदक पटकाविले.


 सतरा वर्षे वयोगटातील मुलींच्या फ्री स्टाइल स्पर्धेत शाळेतील निधी हंडीबाग या विद्यार्थिनीने रोप्यपदक मिळवले तर 19 वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाने वॉटर पोलो प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. शाळेचे क्रीडा संचालक दीपक माने, क्रीडा शिक्षक सचिन मंजुळे, वैशाली सोळंके व पुरुषोत्तम सोळंके यांनी विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी विशेष प्रयत्न केले. 

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. प्रकाश दादा सोळंके, उपाध्यक्ष वीरेंद्र सोळंके, सचिव मंगलाताई सोळंके, समन्वयक नीला देशमुख, प्राचार्य अन्वर शेख, उपप्राचार्य राहुल कदम तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या