Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पत्रकार लक्ष्मण वाकडे यांची कन्या प्रा.स्नेहा वाकडे यांच्या पुस्तकाचे चंदुलाल बियाणी,डॉ.दंडे यांच्या हस्ते प्रकाशन

 आपला ई पेपर Parli 


परळी वैजनाथ येथील प्रा.स्नेहा लक्ष्मण वाकडे यांच्या ‘सोशल अँड प्रिवेंटिव्ह फार्मसी’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (दि.24) रोजी परळी येथील औद्योगिक वसाहत केंद्र येथे विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व राजस्थानी मल्टीस्टेट या पतसंस्थेचे अध्यक्ष चंदुलालजी बियाणी, डॉ.विवेक दंडे, शिवसेनेचे अभयकुमार ठक्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

पंजाब येथील एस.विकास अँड कंपनी या मेडिकल प्रकाशन संस्थेने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. औषध निर्माण शास्त्राच्या पदवीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त असणार आहे. साथ रोगाच्या प्रादुर्भावावेळी औषध निर्माण शास्त्र पदवी धारकांची जबाबदारी व सामाजिक आरोग्य याबाबतची अभ्यासपूर्ण माहिती या पुस्तकात आहे. 

प्रा.स्नेहा लक्ष्मण वाकडे यांच्यासह प्राध्यापक राहुल वाघमारे, डॉ.क्रांती सातपुते, प्रा.विजयकुमार चाकोते यांनी संयुक्तपणे या ग्रंथाची निर्मिती केली आहे. 

या पुस्तक प्रकाशनावेळी हभप रामेश्वर महाराज कोकाटे, मराठवाडा साथीचे संपादक सतीशशेठ बियाणी, कार्यकारी संपादक ओमप्रकाश बुरांडे, शिवसेनेचे नेते संजय कुकडे, कल्पनाताई बियाणी, भारतीताई बियाणी, सौ.बुरांडे, अरुणा बालाजी भोयटे, ह.भ.प.जनाताई महाराज कोकाटे, मुक्ता महाराज कोकाटे, राकेश चांडक आदी मान्यवरांसह ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे, सौ.सुमनताई वाकडे  आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

‘सोशल अँड प्रिवेंटिव्ह फार्मसी’ हा अभ्यास पूर्ण ग्रंथ असून फार्मसीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी तो उपयुक्त ठरेल असा विश्वास श्री बियाणी, डॉ.दंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. प्रा.स्नेहा वाकडे यांनी या ग्रंथाची माहिती दिली. आभार प्रदर्शन लक्ष्मण वाकडे यांनी केले. वैद्यनाथ औद्योगिक वसाहतीच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या