Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शिक्षण व रोजगार खाजगीकरण विरोधात विद्यार्थी युवक रस्त्यावर


आपला ई पेपर परळी प्रतिनिधी

एस.एफ.आय व डी.वाय.एफ.आय.या विद्यार्थी व युवकांच्या संघटनेच्या वतीने देशभर होत असलेल्या निदर्शनाच्या मोहिमेत सोमवार दि 16 रोजी परळी तालुक्यातील असंख्य विद्यार्थी व युवक शिक्षण वाचवा,शाळा वाचवा व रोजगार वाचवा या घोषणेसह शेकडो युवक,विद्यार्थी रस्त्यावर उतरले.

बीड जिल्हा हा उसतोड मजुरांचा जिल्हा असून जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी बांधव वर्षानुवर्ष शेती,ऊस तोडणी करून, मोलमजुरी करून आपल्या मुलांना शिकवून नोकरीचे स्वप्न बघतात या युवक ,विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या स्वप्नाला उध्वस्त करण्याचं काम महाराष्ट्र सरकार आपल्या धोरणाच्या माध्यमातून करत आहे याबद्दलचा तीव्र संताप सर्व स्तरातून होत आहे. गतिमान सरकार ,गरिबांचे सरकार या शासनाच्या सर्व पोकळ घोषणा आहेत याची प्रचिती दिवसेंदिवस इथल्या  युवक, विद्यार्थ्यांना व नागरिकांना होत आहे सर्व स्तरातील लोक शासनाच्या या व इतर खाजगीकरण कंत्राटीकरण निर्णयाविरोधात रस्त्यावरती उतरत आहेत.आरोग्य सेवेसारख्या अत्यावश्यक सेवेच्या खाजगीकरणाचा घेतलेला निर्णय इथल्या जनमानसाच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर घातलेला घाला आहे असे आज जनमानसाची भावना निर्माण झाले आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थ्यांनी आता सावधान राहायला पाहिजे

दूर खेड्यापाड्यातून वस्ती वाइयातून, गावपाड्यातून आपल्या कष्टकरी-शेतकरी आईबापांचे कर्जाचे ओझे आपण चांगले शिक्षण घेऊन, सरकारी नोकरीला लागून, हलके करण्याचे स्वप्न उराशी बाळगून युवक अत्यंत चिकाटीने दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून स्पर्धा परीक्षेची तयारी करता. युवकांच्या या सरकारी नोकरीच्या स्वप्नांना बेचिराख करणारे आणि  भविष्य उध्वस्त करणारे खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाचे काळे शासन निर्णय काढण्याचा सपाटा विद्यमान सरकारने लावला आहे.

गरिबांचे सरकार, सर्वसामान्यांचे सरकार अशा पोकळ घोषणा एका बाजूला करायच्या आणि गरिबांच्या लेकरांच्या हक्काच्या सरकारी नोकच्या मात्र कंत्राटी करायच्या म्हणजे 'ताकाला बोलवायचं आणि भांडं लपवायचं' अशी दुटप्पी भूमिका दुसऱ्या बाजूला है सरकार उघडपणे घेत आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या हक्काची सरकारी नोकरी टिकली पाहिजे, तिचं खाजगीकरण- कंत्राटीकरण तात्काळ थाबलं पाहिजे यासह अनेक मागण्या घेऊन आपण सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक व विद्यार्थी सरकारच्या कंत्राटीकरणाच्या आणि खाजगीकरणाच्या या काळ्या निर्णया विरुद्ध मोठ्या संख्येने संख्येने या हक्काच्या आणि अधिकाराच्या लढ्यात निदर्शने आंदोलनाच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी व युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते . 

या निदर्शनामध्ये डी वाय एफ आय चे जिल्हा सचिव विशाल देशमुख एस एफ आय चे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश कोकाटे परळी तालुका सचिव विजय घुगे व उपाध्यक्ष मुंजा नवघरे ,सिद्राम सोळंके ,मदन वाघमारे,प्रशांत मस्के , मनोज स्वामी, इस्माईल शेख, दामोदर घुगे,,धनंजय वाव्हळे,तसेच एस.एफ.आय विद्यार्थी संघटनेचे नंदिनी केंद्रे ,शिवकन्या जाधव,पांडुरंग काळे शुभम पुरी, धनंजय गरड यांच्यासह असंख्य विद्यार्थी,युवक रस्त्यावर उतरून या निदर्शनात सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या