Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

एकतर माझी अंत्ययात्रा..निघेल नाहीतर मराठा आरक्षणाची विजययात्रा...येत्या १० दिवसांत आरक्षण द्या संघर्षयोद्धा मनोज जरांगे

आपला ई पेपर जालना 


एकतर माझी अंत्ययात्रा..निघेल नाहीतर मराठा आरक्षणाची विजययात्रा निघेल. येत्या १० दिवसांत मराठ्यांना ओबिसीतून आरक्षण द्या नाहीतर छाताडावर बसून आरक्षण घेवू असा इशारा मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला.

दि.२४ ऑक्टोबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर २२ तारखेला पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. आज सरकारला विनंती मराठा समाजाची भावना लक्षात घ्या येत्या १० दिवसांत आरक्षण द्या अन्यथा ४० व्या दिवशी सांगू... तसेच पुढे काय होईल याची जबाबदारी सरकारचीच राहील. एकच सांगतो लोकशाही मार्गाने आंदोलन करायचे आहे. निवांत रहा टेन्शन घेवू नका. आरक्षण मिळून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा एक इंचही मागे हटणार नाही, असा शब्दही जरांगे पाटलांनी विराट मराठा लाखोंच्या समाजाला दिला.

विराट इशारा महासभेला संबोधीत करताना ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून या सभेला जोरदार टाळ्यांच्या आवाजात सुरुवात झाली. गेल्या २० वर्षांपासूनचा हा संघर्ष आता अंतिम टप्प्यावर येवून पोहोचला असल्याची आठवण यावेळी सूत्रसंचालकाने करून दिली आणि एकच गर्जना केली. एक मराठा त्याचवेळी जन समुदायामधून बुलंद आवाज आला लाख मराठा. मनोज जरांगे पाटील यांनी आज अतिशय महत्त्वाच्या घोषणा केल्या. आज भाषण होणार नाही.


महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत असे मनोज जरांगे यांनी सुरुवातीलच सांगितले. त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या अशा-


१) आपली मूळ मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा.


२) कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणार्या हरामखोर नराधमाला लवकर फाशी द्यावी 

३) मराठा आरक्षणासाठी बलीदान देणार्या ४५ समाज बांधवांना

सांगितलेला निधी व सराकारी नौकरी तातडीने द्यावी

४) मराठा समाजाचा सर्वे करावा

५) सारथी संस्थेमार्फत पीएचडी कराणार्या विद्यार्थ्यांना ज्यास्तीचा निधी देवून त्यांचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावावे 

६) ५० टक्केच्या वर आरक्षण आम्ही घेणार नाही. 

७) सरकारनं जे गुन्हे अजून मागे घेतले नाही ते तातडीने मागे घ्यावे

उरलेल्या १० दिवसांत आरक्षण द्या नाहीतर ४० व्या दिवशी सांगू

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या