Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

डेंग्यूचे वाढते रुग्ण |जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर अशी घ्या काळजी


आपला ई पेपर /परळी/ बीड 


जिल्ह्यात मध्ये सध्या डेंगू च्या रुग्नाची संख्या वाढली असून जिल्ह्यात डेंग्यूने डोके वर काढले असून रुग्ण वाढत असल्याने लोकांत तो चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून गावोगावी रुग्णांच्या सॅम्पल घ्यायला सुरुवात केली आहे. आतापर्यत 98 रुग्णांना डेंगूची लागण झाली असून 6 रुग्णांचा डेंगूमुळे मृत्यू झाला आहे.

 यामुळे बीड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी डेंगूची लागण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती दिली आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आलेल्या 844 रुग्णांपैकी यंदा 98 रुग्णांना डेंगूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आली आहे.


काय घ्यावी काळजी? 

कूलरमधील पाणी आठवड्यातून एकदा बदलावे.

घरामध्ये कीटकनाशकांची फवारणी करावी.

मुलांना असे कपडे घालावेत की त्यांचे हात पाय पूर्णपणे झाकले जातील.

झोपताना मच्छरदाणी वापरा.

मच्छर प्रतिबंधक वापरा.

टाक्या आणि भांडी झाकून ठेवा.

काय आहेत डेंगूची लक्षणे ? 

डोकेदुखी, स्नायू, हाडे आणि सांधे दुखणे, मळमळ डोळ्यांच्या मागे वेदना,सुजलेल्या ग्रंथी, त्वचेवर पुरळ हे डेंगूची लक्षणे आहेत. त्यामुळे तुम्हालाही ही लक्षणे आढळून येत असतील तर तुम्ही जिल्हा परिषेदेच्या आरोग्य विभागत येऊन तपासणी करू शकतात, अशी माहिती उल्हास गंडाळ यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या