Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सिंदफणा शाळेची वाईल्ड विस्डम चॅलेंजमध्ये राज्यस्तरीय फेरीसाठी निवड

 आपला ई पेपर माजलगाव 


दिल्ली येथील केंद्रीय माध्यमिक शिक्षण विभाग आणि वाईल्ड विस्डम अकादमी यांच्या वतीने भारतातील सीबीएसई शी संलग्नित शाळेतील सहावी ते दहावी मधील  विद्यार्थ्यांसाठी वाईल्ड विस्डम ग्लोबल चॅलेंज २०२३-२४ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. 

या स्पर्धेमध्ये  शाळेतील ३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी नववीतील हर्षदा नाईकनवरे आणि आदित्य बडे या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सिंदफणा पब्लिक स्कूल ही राज्यस्तरासाठी निवडण्यात आलेली बीड जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे. त्याबद्दल या विद्यार्थ्यांचे तसेच सिंदफणा पब्लिक स्कूलचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, केंद्रीय माध्यमिक शिक्षण विभाग दिल्ली तसेच दिल्ली येथील वाईल्ड विस्डम अकादमी यांच्या वतीने  इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण, जैवविविधता व वन्य प्राणी - पक्षी यांच्या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी वाईल्ड विस्डम ग्लोबल चॅलेंज २०२३-२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

२००८ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा आज एका आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा झाली असून यामध्ये ९० देशातील सुमारे ७ लाख विद्यार्थी सहभागी होतात. सहभागी विद्यार्थ्यांना शालेय स्तर तसेच विविध दृक - श्राव्य माध्यमाद्वारे पारखून राज्यस्तरासाठी निवडण्यात येते. यामध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या आदित्य बडे आणि हर्षदा नाईकनवरे यांनी यश संपादन केले. या स्पर्धेसाठी शाळेतील शिक्षिका संध्या नोकवाल यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. 

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ.प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष वीरेंद्र सोळंके,सचिव मंगलाताई सोळंके, समन्वयक नीला देशमुख, प्राचार्य अन्वर शेख, उपप्राचार्य राहुल कदम, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

*Breaking News|धक्कादायक परळीत चालत्या शिवशाही बसने घेतला पेट*

*आपला ई पेपर_Online*

*#न्यूज_माझा*

🎯🎯✍️✍️

*https://aplaepaper.blogspot.com*


*🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*

*🎯👇👇👇

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*🎯संतोष बारटक्के*

*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या