Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पालखी मार्गावरील खोदून ठेवलेले रस्त्याचे अर्धवट कामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी |अभय कुमार ठक्कर

 


आपला ई पेपर |परळी | प्रतिनिधी


परळीत दसरा महोत्सव निमित्त प्रभू वैधनाथच्या पालखीचे नगर प्रदक्षिणा  परळी येथील वैद्यनाथ मंदिर येथून प्रस्थान होते. शहरातील अनेक भागातून ही पालखी कालराञीदेवी, बटभैरव, डोंगर तुकाई मार्गे परत वैद्यनाथाच्या मंदिरात मार्गक्रमण करते परंतु गेल्या १ वर्षापासून श्री वैद्यनाथ पालखी मार्ग खोदून ठेवला आहे.


दि. 24 ऑक्टोबर रोजी विजया दशमी (दसरा) निमीत्त प्रभु वैद्यनाथाची पालखी व कालरात्री देवीची पालखी ज्या मार्गाने जाते या प्रभू वैद्यनाथाची पालखीचे ठिकठिकाणी भक्ती भावाने दर्शनासाठी भक्त दर्शन घेतात या दसरा महोत्सवात अनेक परिसरातील ज्येष्ठ लहान थोर मंडळी महिला 9 दिवस पायी दर्शनासाठी  जातात.तो पुर्ण मार्ग खोदून ठेवल्यामुळे हे रस्त्याचे काम अर्धवट झाल्या रस्त्यावर मुळे या मार्गावर चालणे सुद्धा अवघड झाले आहे.


तात्काळ हा पालखी मार्ग तयार करण्यात यावा नगरपालिका व तहसील प्रशासनाने वैयक्तिक याबाबत लक्ष देऊन संबंधीत गुतेदारास निर्देश देण्यात यावेत व लवकरात लवकर हा पालखी मार्ग तयार करण्याची मागणी शिव सेना उपजिल्हा प्रमुख, अभयकुमार (पप्पु) ठक्कर,श्रीनिवास सावजी,अतुल दुबे,मोहन परदेशी,संजय कुकडे,किशन बुंदिले,सतिश जगताप,योगेश घेवारे आदींनी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

अजित पवारांनी तडकाफडकी  राजीनामा  दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण*
👇👇✍️✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_37.html*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या