Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

प.पू.संत अलकाश्रीजी यांच्या शुभहस्ते राजस्थानी मल्टीस्टेट मुख्य कार्यालयाचे आज नवीन जागेत स्थलांतर होणार..

आपला ई पेपर |परळी |प्रतिनिधी


 राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीच्या परळी येथील मुख्य कार्यालय व मुख्य शाखेचे नवीन जागेत घरणीकर रोडवरील भव्य इमारतीत आज गुरुवारी (ता.७) दुपारी एक वाजता   महाराष्ट्र मिरा प.पू.संत सुश्री अलकाश्रीजी यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते स्थलांतर होणार आहे.


महाराष्ट्र मिरा प.पू.संत सुश्री अलकाश्रीजी यांच्या शुभहस्ते नवीन नवीन जागेवर शुभविवाह श्रीफळ वाढून, श्री सत्यनारायण महापूजा व स्नेहमिलन कार्यक्रम करण्यात आला आहे. या स्थलांतराच्या कार्यक्रमास राजस्थानी मल्टीस्टेट चे सभासद व ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष चंदुलाल मो.बियाणी, उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती, सहसचिव पी.डी.अग्रवाल, कोषाध्यक्ष विजयप्रकाश लड्डा, संचालक अशोक जाजू, सतीश सारडा, सौ. प्रेमलता बाहेती, सौ.कल्पना बियाणी, नामदेव रोडे, अजय पुजारी, कार्यकारी संचालक जगदिश बियाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही बी कुलकर्णी, शाखा व्यवस्थापिका सौ. वंदना कांबळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या