Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शुद्ध हवा,पाणी बचत कौशल्य विकसीत करण्यासाठी ग्रीनक्लबची स्थापना

 आपला ई पेपर |परळी प्रतिनिधी 


येथील लक्ष्मीबाई देशमुख महीला महाविद्यालयात महाराष्ट्र शासन व युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवक्तींच्या सहाय्याने नैसर्गीक साधनसंपत्तीचे संरक्षण तसेच पाण्याची बचत हे अभियान राबविण्यात


येत आहे. यानिमित्ताने महाविद्यालयात ग्रीनक्लबची स्थापना सोमवारी (दि.११) प्राचार्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

राज्यातील १३ निवडक जिल्ह्यातील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या युवक-युवती मध्ये वातावरण व हवामान तसेच पाणी बचत याविषयी कौशल्य विकसीत करण्यासाठी ग्रीनक्लबची स्थापना करण्यात आली. ग्रीनक्लबचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्याताई देशपांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या संचालिका  छायाताई देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ग्रीनक्लबच्या समन्वयक डॉ. संगीता कचरे, डॉ. व्ही. डी. गुळभिले, डॉ व्ही आर मुंडे, डॉ. राजश्री कल्याणकर, डॉ. विनोद जगतकर, प्रा. शरद रोडे, ग्रीनकल्बच्या युवा प्रतिनिधी निखीला राठोड, सानिया पठाण, सायली चाटोरीकर, आरती डाके या उपस्थित होत्या.

याप्रसंगी 'वृक्षारोपण' करून वृक्ष सर्वधनाचे महत्व या विषयी मागदर्शन करण्यात आहे. तसेच युवतीच्या हस्ते 'वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयीन समन्वयक व विद्यार्थीनी प्रतिनिधी यांना पर्यावरण संवर्धन जागृतीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


हेही वाचा
*CBSE | दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वात मोठा बदल अशी राहील प्रश्नपत्रिका व मार्क पद्धत*

*आपला ई पेपर*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/09/cbse.html*

*CBSE | मंडळाची नवीन नमुना प्रश्नपत्रिकांचे संच...*

*परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न राहतील तसेच मार्किंग सिस्टीम कशी असेल..वाचा संपूर्ण*

*हेडलाईन्स न्यूज*
*आपला@पेपर | आपली बात |आपली बातमी | Breaking | ब्रेकिंग न्यूज |*

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या