Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सायबर सुरक्षिततेचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहंचले पाहिजे -प्रेम कुलकर्णी

आपला ई पेपर/अंबाजोगाई 


ऑनलाइन व्यवहाराच्या जमान्यामध्ये सायबर अटॅकचे मोठ्या प्रमाणात प्रस्त वाढले आहे देशभरात दर दहा मिनिटाला एक सायबर अटॅक होतो.सायबर सुरक्षिततेचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, जेणेकरून फसवणुकीसारखे वाढते प्रकार बंद होतील. आपली फसवणूक होणार नाही यासाठी प्रत्येक व्यक्तीने सायबर अटॅक विषयी जागरूक असावे.असे मत सायबर सेक्युरीटी अभियंता प्रेम कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

 ते योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी गणेशोत्सव व्याख्यानमालेत सायबर सेक्युरिटी या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी यो.शि.संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. एम एस.लोमटे होते. 

मंचावर उपाध्यक्ष ॲड.शिवाजीराव कराड, सहसचिव एन.के.गोळेगावकर हे उपस्थित होते.

पुढे बोलतांना कुलकर्णी म्हणाले की ,सायबर सुरक्षिततेचे ज्ञान नागरिकांमध्ये अत्यल्प आहे.सायबरचे ज्ञान असणा-याची संख्या वाढणे आवश्यक आहे.सायबर सुरक्षेत भारत जगात दहावा क्रमांकावर आहे.सायबरचे ज्ञान सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहचायला प्रशिक्षण हवे आहे. सायबर क्राईम इतरांना डॅमेज करण्यासाठी वापरला जातो.देशात दहा मिनीटाला सायबर ॲटॅक होतो.कुठलाही मोबाईल अथवा लॅप टाॅप सुरक्षित असू शकत नाही.

टेक्निकल आणि नाॅन टेक्निकल ॲटॅक असे सायबर ॲटॅकचे प्रकार आहेत. मुख्यत्वे  सोशल इंजिनिअरिंगचा वापर करून फसवणूक करण्याची पद्धत जगात अधिक आहे.शालेय शिक्षणात सायबर सुरक्षितता विषयाचा समावेश करवा.नागरिकांनी

 ओटीपी, क्रेडिट कार्ड कोड , पिन नंबर इत्यादी शेअर करू नये,युवकांनी सोशल मिडीयावर खाजगी माहिती शेअर करू नये.असेही ते म्हणाले संचालन गिरीष रत्नपारखी यांनी तर आभार सदाशिव डोर्ले यांनी मानले यावेळी संस्था पदाधिकारी, संचालक, कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या