Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

RPLS | PODAR आमच्या पप्पांनी गणपती आणला फेम छोट्या सेलिब्रिटींनी जिंकले सर्वांचे मन



Video 




साईराजच्या निरागस हावभावाने आज 
RPLS | PODAR राजस्थानी पोदार लर्न स्कूलमध्ये  सगळ्यांचे मन जिंकून घेतले..

परळी /प्रतिनिधी 


आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यामुळे परळी तालुक्यातील साईराज केंद्रे  देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचला आहे. हा परळीचा भूमिपुत्र आणि चिमुकल्यांचा  स्टार हा पोदार शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन म्हणून आज RPLS | PODAR राजस्थानी पोदार स्कूलमध्ये थेट भेट म्हणून शाळेतील गणेश मंडळाची आरती छोटा सेलिब्रिटी साईराज केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आली.


आमच्या पप्पांनी गणपती आणला 'या गाण्यातील साईराजच्या निरागस हावभावाने आज राजस्थानी पोदर लर्न स्कूलमध्ये सगळ्यांचे मन जिंकून घेतले.यावेळी या छोट्या सेलिब्रिटीचा सत्कार सोहळा राजस्थानीज पोदार स्कूलमध्ये आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी RPLS | PODAR शाळेचे सहसचिव धीरज बाहेती हे होते.तर प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील, परीक्षा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर गुट़टे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला.


आमच्या पप्पांनी गणपती आणलाया व्हिडीओला अवघ्या काही दिवसांत कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आपल्या निरागस हावाभावाने साईराज सगळ्यांचा लाडका बनला आहे. आता साईराजचे नवे गाणे चाहत्यांच्या भेटीला आले आहे.

RPLS | PODAR पोदार लर्न स्कूलचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग, यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली  हा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

 साईराजसोबत लोकप्रिय बालकलाकार या सर्व प्रवासामध्ये शाळेच्या वतीने त्यांना पुढील शुभेच्छा दिल्या आहेत. 

*RPLS |राजस्थानीज पोदार स्कूलमध्ये उत्कृष्ट असा अप्रतिम आकर्षक देखावा*

*इको फ्रेंडली श्री गणेशाची स्थापना..*

*12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हिमालय पर्वतामध्ये हे उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिर*.  👇👇👇
*https://youtube.com/shorts/wjcT66D6rUs?si=kGoRlwWnaDraC8sb*

*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*

👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या