Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत वैद्यकीय क्षेत्रात संवेदनशील व्यक्तिमत्त्व...

आपला ई पेपर


परळी व तालुक्यात सुपरिचित नाव! सदैव हसमुख व्यक्तिमत्व डॉक्टर गुरूप्रसाद देशपांडे...संतोष बारटक्के

खरा तो संवेदनशील मार्ग, एका "शल्य"चिकित्सक डॉक्टरची कहाणी 

डॉक्टर म्हटले तिथं इंजेक्शन, ऑपरेशन, गोळ्या- औषधींचा कडकटपणा आला आणि नाक दाबून ते अनिच्छेने ग्रहण करणे आलेच. हे सारे  असंवेदशीलतेचा प्रकार वाटत असला तरी रुग्ण तंदुरुस्त व्हावा, हाच डॉक्टरांचा प्रामाणिक सद्‌भाव असतो. पण काही-काही डॉक्टर रुग्ण, त्याचे नातेवाईक आणि समाजाप्रतीही संवेदशील मनाचा कोपरा जपून असतात. यातील एक नाव म्हणजे डॉक्टर गुरुप्रसाद जगदिशराव देशपांडे. शिशु-बालरोग तज्ज्ञ म्हणून डॉ.गुरुप्रसाद हे परळी व तालुक्यात सुपरिचित नाव! वैद्यकीय क्षेत्रात हात गुणावरुन उपचारासाठी ओळखले जाणारे हे डॉक्टर.. एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व !

त्याची साक्ष देणाऱ्या उदाहरणांची जंत्रीच येथे देता येईल. पण त्यातला ताजा आणि अलिकडचा अनुभव डॉक्टरांमधील माणुसकीच्या उंचीचे दर्शन घडवणारा आहे. 

एक बाल रुग्ण. गंभीर आजाराचे निदान झालेला. पुढील सर्वोपचार महानगरांमध्ये करावे लागणार होते. त्याचे स्वरूप बहु खर्चीक. उपचार व्यवस्था परळीबाहेरची असल्याने डॉक्टरांच्या "कार्य" क्षेत्रात नव्हती. प्रत्यक्ष उपचारात सहभाग घेणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत एखादा नुसताच चिंता करत बसला असता. पण डॉक्टर गुरुप्रसाद यांची तळमळ त्या बाल रुग्णाला पुनर्जीवन मिळावे, उपचाराची बहुखर्चीक रक्कम जमा व्हावी, यासाठी लागलेली होती. वैद्यक कामकाजात असताना अशी तळमळ, चिंता समजू शकतोत. पण तुम्ही नियोजित दौऱ्यानुसार दूर प्रदेशात असाल तर तेथून फारतर माहितीपुरता एखादा फोन कराल. डॉक्टर मात्र सकाळ-दुपार, संध्याकाळ रुग्णाला औषधे द्यावीत किंवा त्यांची आठवण करून द्यावी, असा दररोज तीन-चार वेळेस फोनवरून संपर्क साधत उपचाराचा आढावा घेत होते. खरं तर डॉक्टरांना चिंता वाटत होती मदतीतून जमा होणाऱ्या रकमेची. आकडा मोठा असल्याने चिंता वाटणे स्वाभाविक असले तरी पैसा कमी पडला म्हणून पुढची प्रक्रिया थांबू नये, याची तळमळ त्यांच्या ठायी-ठायी जाणवत होती. फार मोजके जन डॉक्टरांचे हे संवेदनशील रूप अनुभवत होते. ज्यांचा-ज्यांचा जनसंपर्क आहे, मदतीसाठी जे-जे तत्पर होऊन पुढे सरसावतात, अशा प्रत्येकाशी चार-दोन तासाला संवाद साधत होते. अगदी रात्री साडे दहानंतरही. 

सरकारस्तरीय यंत्रणेकडून काय मदत मिळते, यासाठी अनेकांना बोलत होते. अनेकांना त्यांचे सोर्स वापरायला सांगत होते, अगदी हक्काने ! "पोर मोठं गोड आहे, यशस्वीपणे उपचार व्हायला हवेत. आपण मिळून करू काहीतरी" हे वाक्य ज्या तळमळीने डॉक्टर बोलायचे त्या संवेदनशीलतेला तोड नाही. समोरच्या व्यक्तीला हुरूप यायचा. डॉक्टर गुरुप्रसाद यांची "शल्य" चिकित्सक ही ओळख सार्थ ठरते आणि शब्दशः अर्थही सुस्पष्ट करते. दुःख, वेदनेची चिकित्सा जाणणारा तोचि शल्यचिकित्सक, असाच तो अर्थ आहे. वैद्यक क्षेत्राला सेवा आणि समर्पणभाव, या दोन रुळांचे मजबूत बल लाभले तर तुमचा एकूणच प्रवास बुलेट ट्रेनसारख्या गतीने होतो. सोबत अनुभवांची श्रीमंती घरी नांदते. 

डॉक्टरांच्या संवेदनशीलतेलाही विवेकाचे एक अधिष्ठान आहे. प्रसिद्धीच्या आभासी दुनियेतून ते स्वतःला दूर ठेवतात. वलयांकित व्यक्तिमत्त्व राहील, यासाठी त्यांचा प्रयत्न नसतो तर मुख्य उद्देशपूर्ती साधता आली पाहिजे किंवा तसा तो साधला तर शांतपणे बाजूला होऊन आपल्या कामावर लक्ष यायचे,  या वर त्यांचा कटाक्ष. कणभर केले आणि मणभर दाखवण्याच्या आजच्या जगात डॉक्टर प्रसिद्धी परांङमुखपणा निक्षून जपतात. 

आज डॉक्टरांचा वाढदिवस. त्या निमित्त डॉक्टरांना आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभो, यासाठी खूप-खूप शुभेच्छा व त्यांच्याकडून रुग्णसेवा घडो आणि त्यात त्यांना कायम यश लाभो ही प्रभु वैद्यनाथचरणी प्रार्थना  


अनंत कुलकणी परळी


#Breaking news_
*भिषण अपघात ट्रॅव्हल्स खाली चिरडून एका प्राध्यापकाचा दुर्दैवी मृत्यू *

*https://aplaepaper.blogspot.com/2023/09/blog-post_42.html*

*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*

👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या