Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

|खेळातून व्यायाम आणि आरोग्य यांचा समतोल | धीरज बाहेती

 आपला ई पेपर |परळी 


खेळ आणि मैदान याचे विशेष आकर्षण राजस्थानी पोदार लर्न स्कूलचे सहसचिव धीरज बाहेती यांना आधीपासून असल्याने पोदार शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांना देखील याची आवड निर्माण व्हावी ,खेळातून व्यायाम आणि आरोग्य यांचा समतोल राखण्यासाठी एक दिवस खेळासाठी म्हणून आज दि. 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने पोदार शाळेतील सर्व शिक्षकांची वनडे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


 या स्पर्धांच्या माध्यमातून शिक्षकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे या प्रेरणेतून प्रोत्साहन देत पोदार शाळेचे सहसचिव धीरज बाहेती यांनी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.त्यांच्या या प्रेरणेमुळे तब्बल तीन तास शिक्षकांनी क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेत आजचा शिक्षक दिन उत्साहात साजरा केला.

 तब्बल तीन तास हि क्रिकेट स्पर्धा रंगली होती.या वेळी विद्यार्थी दशेतील क्रिकेट खेळाच्या आठवणींना अनेक शिक्षकांनी उजळा दिला.यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

परळी गंगाखेड रोडवर असलेल्या  अकॅडमी संकुलात ही स्पर्धा आयोजित केली होती यावेळी  सतीश गुट्टे सर व शाळेचे उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी विजेत्या संघाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या