Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

|Parli |अमृत भारत स्टेशन' योजने बरोबर नवीन रेल्वे सेवा व प्रमुख मागण्याही रेल्वे प्रशासनाने मंजुर कराव्यात|चंदुलाल बियाणी

आपला ई पेपर | Parli|


परळी 'अमृत भारत स्टेशन स्कीम' अंतर्गत परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होणार असून त्या कामाचे भूमीपूजन मा. पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीने रविवारी सकाळी 11:00 वाजता होत आहे. पुनर्विकास योजनेनुसार परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा कायापालट होऊन ते अधिक अद्ययावत व सुशोभित होणार आहे. याबद्दल माननीय पंतप्रधान, श्री नरेंद्रजी मोदी, मा. रेल्वे मंत्री ना. श्री अश्विनी वैष्णव, मा. रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे, मा.रेल्वे राज्यमंत्री ना. दर्शनाजी जरदोश, बीडच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे इत्यादींचे परळी रेल्वे संघर्ष समिती जाहीर आभार मानते.

या पुनर्विकासा सोबतच खालील काही महत्त्वाच्या, योग्य व बहुप्रलंबित मागण्या देखील रेल्वे प्रशासनाने त्वरित मंजूर कराव्यात अशी या परिसरातील जनतेची रास्त अपेक्षा आहे.

विकाराबाद-परळी वैजनाथ आणि परभणी- परळी वैजनाथ हे दोन रेल्वे मार्ग स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात आहेत. त्यानंतर अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाचे काम चालू झालु आहे ते पूर्ण होताच परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाला 'जंक्शन स्टेशन' असा दर्जा प्राप्त होणार आहे.

त्याशिवाय मानवत रोड-मानवत पाथ्री-सोनपेठ-परळी वैजनाथ, बेलापूर (श्रीरामपुर ) - नेवासा - शेवगाव-गेवराई - परळी वैजनाथ व तसेच घाटनांदुर-अंबाजोगाई - केज-मांजरसुंबा -पाटोदा-जामखेड- दौंड असे तीन रेल्वे मार्ग देखील काही वर्षांपूर्वीच मंजूर झालेले आहे. त्यामुळे परळी वैजनाथच्या रेल्वे स्थानकास विशेष बाव म्हणून विशेष दर्जा मिळणे क्रमप्राप्त झाले आहे...

मुंबईत 'वरळी' आणि मराठवाडयात 'परळी' असे सार्थ पणे म्हटले जाते. शिवाय द्वादश ज्योर्तिलिंग प्रभू वैद्यनाथांच्या वास्तव्याने पुणित तथा पावन झालेल्या परळी वैजनाथ नगरीस 'दक्षिण काशी' असेही संबोधले जाते. त्यामुळे उत्तर काशीच्या म्हणजेच बनारस तथा वाराणसीच्या रेल्वे स्थानकाप्रमाणे या रेल्वे स्थानकाचाही विकास होणे करण्यात यावा. मराठवाडयातील जालना, लातूर या औद्योगिक प्रगत शहरांप्रमाणेच परळी वैजनाथ हे देखील प्रमुख बाजार पेठेचे शहर म्हणून ओळखले जाते. हे परळी शहर अनेक बाबतीत 'मिनी मुंबई' म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे महाराष्ट्राची राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर, प्रादेशिक मुख्यालय तथा राजधानी असलेले छत्रपती संभाजी नगर, शिक्षणाचे माहेरघर पुणे, वारकऱ्यांचे कुलदैवत पंढरपूर, शक्तीपीठ कोल्हापूर, तुळजापूर, अंबाजोगाई, माहूर तसेच पूर्वीची निजाम कालीन राजधानी हैदराबाद, पर्यटन केंद्र गोवा, प्रमुख व्यापारी शहरे सोलापूर, सुरत अहमदाबाद, धार्मिक तीर्थक्षेत्रे वेरावळ-सोमनाथ, नाशिक - त्रिंबकेश्वर, औंढा नागनाथ, शेगाव, काशी विश्वनाथ, - केदारनाथ, ओंकारेश्वर, रामेश्वरम, श्रीशैल्यम इत्यादी आणि देशाची राजधानी नवी दिल्ली साठीही थेट एक्सप्रेस गाडयांची सुरु करण्यात यावा. त्याच बरोबर परळी वैजनाथचा समावेश आदर्श रेल्वे स्टेशन प्रवर्गात करावा. येथे टर्मिनेट होणाऱ्या गाड्यांच्या मेंटेनन्ससाठी पीट लाईन्सची सोय करावी. शहराच्या पूर्वेकडील भागात टाकल्या जाणाऱ्या 'घाटनांदुर- वडगाव' बायपास लाईनवर होणारे दुसरे रेल्वेस्टेशन अगदी सुंदर, अद्ययावत आणि आदर्श करावे. येथील आरक्षण केंद्राच्या कामाच्या वेळा 8 तासा वरून किमान 16 तासा पर्यंत वाढवावी स्वयंचलित जीन्यांची व्यवस्था करावी मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मराठवाडा विभागासाठी किंवा बॉम्बे हायकोर्टच्या औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांसाठी स्वतंत्र 'अमृत भारत मराठवाडा रेल्वे झोन' निर्माण करावा. तिरुपती बालाजीला जाणारे बीड, परभणी, लातुर, इत्यादी जिल्हयातील असंख्य भाविक निजामाबाद-तिरुपती या रॉयल सीमा एक्सप्रेसनेच प्रवास करतात. ती विकाराबादहून सांयकाळी 18:51 ला सुटते त्यासाठी ते सर्व जन नांदेड बैंगलोर एक्सप्रेसने जाऊन विकाराबादला दुपारी 14:25 वा. पोहंचतात तेथे सुमारे 4 तास थांबुन रॉयल सीमाने सा. 18:51 ला पुढे जातात हे 4 तास दिवसाचे असल्यामुळे त्यांना काही अडचण नाही परंतु परतीच्या प्रवासाशासाठी तिरुपतीहुन तिरुपती- निजामाबाद याच रॉयल सीमा एक्सप्रेसने निघुन पहाटे 4:00 विकाराबादला पोहंचतात परंतु पहाटे चार पासून दुपारी दीड वाजेपर्यंत त्यानां विनाकारण ताटकळात थांबावे लागते, विकाराबादला स्थानकावर स्वच्छतागृहांची सोय अपुरी आहे. त्यामुळे पहाटे सुमारे साडे पाच वाजता विकाराबादला येणारी मछलीपटनम - बिदर ही एक्सप्रेस गाडी परळी वैजनाथ पर्यंत विस्तारीत केल्यास सर्वांची सोय होऊ शकते. कारण सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे सात पर्यंत म्हणजे तब्बल 12 तास ही गाडी बिदर स्थानकावरच थांबते त्यापेक्षा ती परळी वैजनाथ पर्यंत जाऊन सहज वेळेवर परत बिदरला पोहंचू शकते. म्हणुन मछलीपटनम - बिदर तसेच हैद्राबाद- बिदर इंटरसिटी एक्सप्रेस यशवंतपुर -बिदर एक्सप्रेस, हैद्राबाद-परभणी एका बाजुने तांडूर पर्यंत विस्तारित केली गेली आहे तसेच ती दुसऱ्या बाजूने देखील परळी वैजनाथ पर्यंत विस्तारित करावी. पूर्णा-परळी वैजनाथ ही पॅसेंजर पुढे कुर्डवाडी पर्यंत विस्तारित करणे.

'शासन आपल्या दारी' असा गाजावाजा केला जातो परंतु 'प्रवासी रेल्वे थांबते दुसऱ्याच गावी' कारण अनेक रेल्वे स्थानकावरील थांबे कोरोना महामारीच्या काळात बंद करण्यात आले आहेत. परंतु अद्याप ते सुरु केले नाहीत. ते सर्व थांबे पुर्वत सुरु करावे. तसेच ज्येष्ठ नागरिक महिला व पुरूष प्रवाशांची प्रवासी भाड्यातील सुट-सवलत पूर्वीप्रमाणे सुरु करावी. नांदेड-पनवेल एक्सप्रेस व इतर काही गाडयांच्या सिलीपर कोचेची संख्या वाढवावी.

काही विशेष रेल्वे गाड्यांच्या क्रमांकातील शुण्य हा अंक कमी करुन त्या गाड्या नियमित काराव्यात जेणे करुन प्रवाशांना जादा विशेष भाड्याचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार नाही. परळी वैजनाथ - पुणे- (लातुर मार्गे), परळी वैजनाथ - गोवा (लातूर - मिरज मार्गे), परळी वैजनाथ मुंबई ( परभणी, मनमाड मार्गे), परळी वैजनाथ - वेरावळ सोमनाथ (सुरत, अहमदाबाद मार्गे), परळी वैजनाथ - वाराणसी (परभणी, पूर्णा, अकोला, खांडवा मार्गे), परळी वैजनाथ- पंढरपूर- एकादशी एक्सप्रेस (प्रत्येक पंधरवाडयाला) अशा नवीन रेल्वे सुरु करण्यात यावात, इत्यादी मागण्या परळी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सचिव जी.एस. सौंदळे आणि सर्व सदस्यांनी केल्या 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या