Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

|Parli| 508 रेल्वेस्थानकांच्या प्रकल्पाची पायाभरणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेऑनलाइन होणार..

आपला ई पेपर |Parli|


पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज,रविवारी रोजी महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानकाच्या कामाचे उदघाट्‌न व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत देशभरातील 1309 आणि महाराष्ट्रातील 44 रेल्वेस्थानकांचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.यापैकी 508 रेल्वेस्थानकांच्या प्रकल्पाची पायाभरणी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. 


त्यावर 24 हजार 470 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 25 राज्यांत 508 स्थानके या माध्यमातून विकसित होतील.या प्रकल्पावर 24 हजार 470 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आगामी 50 वर्षांची गरज लक्षात घेऊन या स्थानकांचा विकास केला जात आहे.


त्यासाठी टेंडर काढण्यात आली आहेत. विकास कार्य अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत केले जात आहे.1300 स्थानकांपैकी काही सोडल्यास सामान्यपणे स्थानक रेल्वे रुळाच्या केवळ एका बाजूने असल्याचे दिसून आले आहे.


काही वर्षांत रेल्वे मात्र रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूने शहर विकसित झाले आहे.त्यामुळे दोन्ही बाजूने लोक स्थानकावर येतात. त्यामुळेच दोन्ही बाजूने स्थानक इमारतीला विकसित केले जाईल.अनेक शहरांत तर रेल्वेस्थानकाजवळच बसस्थानक, ऑटो स्टेशन व मेट्रोही आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकाजवळच वाहतुकीच्या इतर पर्यायांची एकीकृत व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बसस्थानक किंवा ऑटो टॅक्‍सी स्टॅंडशी रेल्वेस्थानकांना जोडले जाण्याचे नियोजन केले आहे.

या स्थानकांचा होणार कायापालट 

महाराष्ट्रातील अहमदनगर, कोपरगाव,बडनेरा,धामणगाव, परळी वैजनाथ,मलकापूर,शेगाव, बल्लारशहा,चांदा फोर्ट,चंद्रपूर, वडसा, गोंदिया,हिंगणघाट, पूलगाव,सेवाग्राम,वाशिम, चाळीसगाव,हिंगोली,जालना, परतूर,कोल्हापूर,लातूर,मुंबई परेल, कांजूर मार्ग,विक्रोळी,काटोल (नागपूर),गोधनी, नरखेड, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), किनवट, मुखेड, मनमाड, नगरसोल,उस्मानाबाद(धाराशिव), गंगाखेड,परभणी,पूर्णा,सेलू, आकुर्डी,दौंड,तळेगाव,कुर्डूवाडी, पंढरपूर,सोलापूर या स्थानकांचा कायापालट होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या