Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भेल संस्कार केंद्रात लढा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा या विशेषांकाचे प्रकाशन

 आपला ई पेपर 


परळी येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित भेल संस्कार केंद्रात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या सांस्कृतिक कार्यक्रमात लढा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विशेषांकाचे प्रकाशन आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास जुगल किशोर लोहिया  विकासराव डुबे, डॉ.विष्णुपंत कुलकर्णी,जीवनराव गडगूळ राजेश्वर देशमुख, अमोल डुबे , गिरीश ठाकुर ' एन. एस.राव, सुनील बोटकुलवार आदींची प्रमुख उपस्थिती होती

त्यानंतर आपल्या मनोगतात सौ.सुनीताताई पेंढारकर यांनी सांस्कृतिक वार्तापत्र या पाकशिकाची पार्श्वभूमी सांगून ते पुढे जागरण पत्रिका कशी बनले ते सांगितले.याची प्रमुख टॅगलाईन म्हणजे "हिंदूच्या मनातील हिंदुत्वाची तार छेडणे" हे आहे असे मत व्यक्त केले...

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. हा सण दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो, या दिवशी 1948 मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली. निजामाच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात समाविष्ट होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात हा संग्राम चालू होता. शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थानाचे सैन्यप्रमुख जनरल अल इद्रीस यांनी शरणागती स्वीकारली व निजामाने पराभव मान्य केला आणि हैदराबाद संस्थानात शेवटी तिरंगा फडकला.

याप्रसंगी पुढे बोलताना मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते श्री. राहुल सोलापूरकर म्हणतात की या मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात अनेक शुरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.यात प्रामुख्याने स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान खुप मोलाचे आहे.तसेच त्यांनी या लढ्याचा खरा  इतिहास  सर्वाना माहित असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.त्यासाठी  त्यांनी तो इतिहास वेगवेगळ्या शैलीत  पुर्ण सांगितला आणि येणाऱ्या 17 सप्टेंबर रोजी आपण सर्वानी मिळून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अगदी जल्लोषात व उत्साहात साजरा करूया असे म्हणत भारत माता की जय आणि वंदे मातरम घोषणा देऊन यावेळी सुप्रसिद्ध मराठी अभिनेते राहुल सोलापूर यांनी आपले मत व्यक्त केले

या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना जुगलकिशोर लोहिया म्हणाले  की " या लढ्यात आर्य समाजाची भूमिका अत्यंत महत्वाची होती. ही निजामशाही व रझाकराचा काळ अनुभवणारी व्यक्ती आजही जिवंत असून ते त्यांच्या भावना व्यक्त करतात.याचा आपल्याला विसर पडता कामा नये.

या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलन सौ.रोहिणी वाकडे यांनी केले. सौ.विद्युलता कराड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख नामदेव मुंडे, सौ.पुनम मंडलिक, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

या कार्यक्रमाची सांगता सामुहिक पसायदानाने करण्यात आली.अशी माहिती प्रफुल्ल सर यांनी दिली आहे

.[27/08, 5:19 PM] 

SANTOSH BARTAKKE: *थेट live..बीड सभा*   *https://aplaepaper.blogspot.com/2023/08/youtube-video-player.html

     *बीडच्या सभेमध्ये विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यात येणार कृषिमंत्री धनंजय मुंडे*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_28.html*

*हेडलाईन्स*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*

👇👇👇

*आपला ई पेपर*

*Breaking |Political | Crime |*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*छोट्या जाहिरातीसाठी संपर्क*

*संतोष बारटक्के*

*9423472426*

[27/08, 9:03 PM] 

SANTOSH BARTAKKE: *Breaking |राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो |उपमुख्यमंत्री अजित दादा पवार*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_65.html*

*परळीत वैद्यनाथ भक्ती मंडळ ....*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_27.html*

*हेडलाईन्स*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*

*9423472426*

[27/08, 10:30 PM] SANTOSH BARTAKKE: *GOOD | NIGHT | SONG | आठवणीतील गीत...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/youtube-video-player_27.html*

 *GOOD | NIGHT |SONG |या आठवणीतील गीत..* 

*हेडलाईन्स*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*

*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या