Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दुष्काळाचे संकट टळू द्या ..भोलेबाबा म्हणत वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या कावड यात्रेकरूनी प्रभू वैद्यनाथास केला जलाभिषेक

आपला ई पेपर |




|परळी वैद्यनाथ|



Parli |खडका ते परळी वैद्यनाथ भक्ती मंडळ आयोजित कावड यात्रा आज दुपारी 2 वा पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिरात दाखल झाली आहे.

बीड जिल्ह्यावर दुष्काळाची संकट टाळावे..

सोबतच वरुणराजाचे आगमन व्हावे म्हणून परळीतील सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे वैधनाथ भक्ती मंडळ आणि सदस्य यांच्या संकल्पनेतून ही कावड यात्रा आयोजित केली होती या कावड याञे 35  यात्रेकरूचा सहभाग आहे .आज ही कावड याञा प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात दाखल झाली आहे..!

दुष्काळाची संकट टळू द्या ..म्हणत वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या कावड यात्रेकरूनी प्रभू वैद्यनाथास केला जलाभिषेक 

धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठान संचलित वैद्यनाथ भक्ती मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम

 धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठान संचलित वैद्यनाथ  भक्ती मंडळाच्या वतीने दि. 27 ऑगस्ट 2023 रोजी  खडका ते परळी कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

बीड जिल्ह्यावर दुष्काळाची संकट टाळावे.. सोबतच वरुणराजाचे आगमन व्हावे म्हणून पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ चरणी साकडे घालण्यात आले. परळीतील सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठान संचलित वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या संकल्पनेतून ही कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

खडका ते परळी कावड याञेत 235  कावड धारी भक्त यांनी सहभाग घेतला होता. शहरातील विविध व्यापारी व विविध संघटनेने तसेच  युवकांनी पुष्पवृष्टी करत कावड यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले. 

हीकावड यात्रा परळी शहरात छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर ) ते स्टॅन्ड रोड मार्गे मोंढा मार्केट राणी लक्ष्मीबाई टॉवर नेहरू चौक मार्गे वैद्यनाथ मंदिरात दाखल झाली. कावड यात्रेचे आगमन परळी शहरात होताच हर हर महादेव, प्रभु वैद्यनाथ भगवान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, जय श्रीराम च्या जय घोषाने परळी शहर दुमदुमले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या