Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

माणिक नगर येथे पुरुषोत्तम मासानिमित्त श्रीसंत तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन

परळी /प्रतिनिधी 



परळी वैजनाथ महारुद्र संस्थान माणिक नगर येथे दर वर्षाप्रमाणे याही वर्षी पुरुषोत्तम मासानिमित्त भव्य दिव्य श्री संत तुकाराम गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन महारुद्र संस्थान माणिक नगर अध्यक्ष अमित केंद्रे तर सचिव राजेश विभुते यांच्या वतीने करण्यात आले आहे.

परळी महारुद्र संस्थान माणिक नगर परळी येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत तुकाराम गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दि. 6 ऑगस्ट  ते 16 ऑगस्ट 2023 यादरम्यान करण्यात आले आहे.  या सप्ताह निमित्त विविध धार्मिक भरगच्च अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन महारुद्र संस्थान माणिक नगर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

संत तुकाराम गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने प्रवचन, कीर्तन व अन्नदानाचा कार्यक्रम दैनंदिन ठेवण्यात आला आहे.व्यासपीठ प्रमुख व मार्गदर्शक म्हणून ह.भ.प. उत्तम महाराज होळंबे मैंदवाडीकर व ह.भ.प नारायण महाराज बारटक्के यांची साथ लाभणार आहे. यात दररोज सकाळी विष्णू सहस्त्रनाम,श्रीची पूजा आरती, सकाळी 8 ते 12 गाथा पारायण टाळ मृदंगा सहित,धुपारती हरिपाठ नंतर भोजन, विश्रांती तसेच संध्याकाळी आठ ते दहा या वेळेत हरिकीर्तन तसेच 10 ते 1 या दरम्यान संगीत भजन, हरिजागर, सोंगी भारुड आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात दि. 6 ऑगस्ट 2023 रोजी भावार्थ रामायणाचार्य संत जनाबाई संस्थान, ह.भ.प. गुट्टे गुरुजी गंगाखेडकर, दि.7 रोजी ह. भ.प. भगवान महाराज महाळंगीकर,दि.8 रोजी ह.भ.प भागवताचार्य बंडोपंत महाराज मुंडे आळंदी देवाची ,दि.9 रोजी ह.भ.प भागवताचार्य बंडोपंत महाराज ढाकणे गुरुजी, दि.10 रोजी ह.भ.प क्षीरसागर महाराज उखळीकर, दि.11 रोजी हभप संभाजी महाराज सानप गंगाखेडकर, दि.12 रोजी हभप शास्त्री बापूदेव महाराज बेलगावकर सुपेकर, दि 13 रोजी ह भ प ह भ प आचार्य विजय महाराज सुपेकर,दि.14 रोजी हभप प्रा.शाम महाराज नेहरकर परळी वैजनाथ,दि.15 रोजी हभप उत्तम महाराज होंळंबे मैंदवाडीकर यांचे पूजेचे कीर्तन 5 ते 7 या वेळेत तर ह.भ.प भागवताचार्य रामचंद्र महाराज काळवांडे सुकीकर,या वेळेत किर्तन सेवा होणार आहे.तर दि.16 रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत भव्य दिव्य दिंडी मिरवणूक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर काल्याचे किर्तन ह.भ.प निष्ठावंत वारकरी गोवर्धन महाराज आळंदी यांचे होणार आहे.

     श्री ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के (परळी वै.), श्री ह.भ.प. भरत महाराज सोडगीर परळी वै.सौ. प्रतिभा गित्ते,शास्ञी नगर, सौ.संजिवनीताई, माणिकनगर, सौ. ज्ञानेश्वरीताई, माणिकनगर, ह.भ.प. डॉ.रफिकभाई पारनेरकर, ह.भ.प.ज्ञानोबा माऊली उखळीकर,श्री ह.भ.प.अंगद महाराज वागबेट, श्री ह.भ.प. माणिकराव धाकपाडे माणिकनगर, श्री ह.भ.प.संपत महाराज नंदागौळकर यांची प्रवचनसेवा या सप्ताहात होणार आहे.

 महारुद्र संस्थान माणिक नगर परळी वैजनाथ दर तृतीय वर्षाप्रमाणे नवव्या पुरुषोत्तम मासानिमित्त भव्य दिव्य श्री संत तुकाराम गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताहातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन महारुद्र संस्थान माणिक नगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या