Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

समाधानी व्यक्तीच कर्तव्यनिष्ठ- उज्वल कार्याचे प्रतीक असतो |डॉ.माधव रोडे

आपला ई पेपर |


परळी प्रतिनिधी वैद्यनाथ कॉलेजमधील रसायनशास्त्र विभागातील प्रयोगशाळा परिचर  बी.डी. केदारे हे नियत वयोमानानुसार निवृत्त होत असल्याने आज विभागाच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख डॉ माधव रोडे होते, तर प्रमुख म्हणून रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बी.व्हि.केंद्रे होते.सत्कारमूर्ती  केदारे यांचासत्कार डॉ.माधव रोडे,डॉ केंद्रे, डॉ गीते आणि डॉ. विनोद गायकवाड यांनी शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख डॉ केंद्रे यांनी  केदारे यांचा कार्यपरिचय दिला. कार्यक्रमात डॉ.गीते, डॉ.विनोद गायकवाड, प्रा वडाळ यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.अध्यक्ष समारोपात डॉ. माधव रोडे म्हणाले की,केदारे म्हणजे अल्प व मृदुभाषी,संयमी,कार्यत्पर व्यक्ती असल्याने ते जीवनात समाधानी आहेत आणि समाधानी व्यक्तीच कर्तव्यनिष्ठ- उज्वल कार्याचे प्रतीक असतो असे त्यांनी नमूद केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ.एम.जी. लांडगे यांनी मानले. या निरोप समारंभासाठी डॉ. मुंडे, डॉ सातपुते,डॉ कलमे, प्रा.गोरे, प्रा.कांदे, प्रा. रेणुकदास,चौकले, अनिल जगतकर, नाथराव मुंडे व अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या