Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

7001 श्रीफळांची भव्य श्री गणेशमूर्ती.. चंदुलाल बियाणी

सभासद भाविकांना मिळणार प्रसाद स्वरूपात मूर्तीसाठी वापरलेले श्रीफळ


आपला ई पेपर |परळी |प्रतिनिधी

दै.मराठवाडा साथी व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरा करण्यात येतो. प्रत्येकच वर्षी काही ना काही विशेष उपक्रम राबविले जातात. यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहे. 7001 श्रीफळांपासून श्रीगणेशाची 11 फुटांची भव्य गणेश मूर्ती साकारण्यात येणार असल्याची माहीती


दै.मराठवाडा साथीचे मुख्य संपादक तथा राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी दिली आहे. नागपूर येथील सुप्रसिध्द मूर्तीकार साकेत हे ही मूर्ती साकारणार आहेत. 

विशेष म्हणजे विसर्जनानंतर मूर्ती साकारण्यासाठी वापरण्यात आलेले श्रीफळ 51 रूपयांचे प्रसाद शुल्क देवून सभासद झालेल्या भाविकांना प्रसाद स्वरूपात देण्यात येणार आहे.

मुख्य मार्गदर्शक चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा साथी गणेशोत्सव दरवर्षी आपल्यासाठी काही तरी नविन आणण्याचा प्रयत्न करीत असतो. मागील वर्षी "अष्टविनायक दर्शन" घडवले. एका छताखाली परळी आणि पंचक्रोशीतील भाविकांना अष्टविनायक दर्शनाचा योग उपलब्ध करून दिला. अद्वितीय अशा या देखाव्याने भाविकांची मने तृप्त झाली. 

भाविकांच्या चेहर्यावरील समाधानाने संयोजक समितीही सुखावली. परळी शहर आणि तालुक्यातील हजारो भाविकांनी या अष्टविनायकांचे दर्शन घेतले. त्यामुळे याहीवर्षी अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणायचा मनोदय उत्सव समितीने मनावर घेतला. खरं तर आपल्यातील प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये "श्री" चा कायम वास रहावा अशी इच्छा आणि भावना असते. भाविकांच्या भावना लक्षात घेऊन "मराठवाडा साथी गणेशोत्सव 2023" उत्सव समितीने अभिनव संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यावर्षी सर्व गणेश भक्तांना प्रसादाच्या रूपाने "श्री"नाच घरी घेऊन जाण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

या वर्षी तब्बल 7001 श्री फळांचा वापर करून श्री च्या मूर्तीची निर्मिती केली जाणार आहे. ही मुर्ती 11 फुट उंचीची असुन नागपूर येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार साकेत हे निर्माणकार्य पार पाडणार आहेत. हे शुभकार्य लोकसहभागातुन प्रत्ययास आणण्याचा संकल्प असुन यासाठी नागरिकांनी 51 रूपये नागरिकांनी देणगी स्वरूपात द्यावयाचे आहेत. प्रत्येकांना याची रितसर पावती दिली जाणार आहे. या मुर्तीची 10 दिवस विधिवत पूजा अर्चना करून श्री चे विसर्जन झाल्यानंतर प्रसाद व आशीर्वाद म्हणून श्रीफळ सहभागी भक्तांना दिले जाणार आहे.  

श्रीफळ स्वरूप गणपती आपल्या घरी वर्षभर पूजागृहात (देवघरात) ठेवू शकणार आहात.  या पवित्र मुर्ती निर्मिती कार्यात आपण 10 सप्टेंबर 2023 पर्यंत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन गणेशोत्सव समितीकडून करण्यात आले आहे.

श्रीफळ स्वरूपातील प्रसादासाठी संपर्क करा

दै.मराठवाडा साथी व राधा-मोहन साथी गणेशोत्सव 2023 मध्ये 11 फुटांची श्रीगणेशांची मूर्ती साकारण्यात येणार आहे. या मूर्तीसाठी लागणारे प्रत्येक श्रीफळ हे भाविकांकडून घेण्याचे नियोजन करण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला असून, ईच्छुक भाविकांना 51 रूपयांची प्रसाद पावती देवून यात सहभाग नोंदविता येणार आहे. श्रीगणेश विसर्जनाच्या दिवशी प्रसाद पावती असणाऱ्या भाविकांना प्रत्येकी 1 याप्रमाणे मूर्तीसाठी वापरलेले श्रीफळ देण्यात येणार आहे. 

राकेश चांडक,ओमप्रकाश बुरांडे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत असून, नाव नोंदणीसाठी राजेश मोदाणी – 997030144, प्रकाश वर्मा – 9096653579, आनंद हाडबे – 9850213019, सोमनाथ गडेकर – 9850715548, शरद कावरे – 8329674113, महेश शिवगण – 9096653579, सुनिल दौंड - , मुरलीधर बंग – 9422541571, जगन्नाथ रामदासी – यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या