Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत 13 वर्षीय मुलीचा विनयभंग | गुन्हा दाखल

 आपला ई पेपर परळी/प्रतिनिध


परळी शहरात आरबी भाषेची शिकवणी घेणाऱ्या व्यक्तीने  शिकवणीला येणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना नुकताच घडली असुन पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन परळीत संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी शहरातील खुदबे नगर भागात शेख सोहेल गणी रा. जुना रेल्वे स्टेशन हे आरबी भाषा शिकवण्याची शिकवणी घेतात. याच भागातील १३ वर्षीय विद्यार्थीनी मागील आठ दिवसांपासून त्या घरगुती शिकवणीला जात होती आरबी भाषा शिकण्यासाठी गेलेली नाबालक मुलगी 

दि.२०,२१ व २२ ऑगस्ट रोजी शिकवणीहून घरी आल्यानंतर सदरील मुलगी रडु लागल्याने तिच्या आईने समजावुन सांगत कारण विचारले असता सदरील मौलाना हा समोर बोलावुन विनयभंग करत असल्याचे सांगितले. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन शेख सोहेल गणी रा.जुना रेल्वे स्टेशन,परळी याच्याविरुध्द संभाजीनगर पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियमाखाली ३५४ (अ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या