Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLi|धरणे आंदोलनात शिक्षकांनी सहभागी व्हा | मशिसं परळी

 आपला ई पेपर परळी

राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध मागण्यासाठी मराठवाड्यातील सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाकडून शुक्रवार दि 21 रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत धरणे/ निदर्शने आंदोलन करण्यात येणार असून या धरणे आंदोलनात परळी तालुक्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष अनुप कुसुमकर (भावसार) यांनी केले आहे.

राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अनेक मागण्या शासन आणि प्रशासन  दरबारी प्रलंबित असून मराठवाडा शिक्षक संघ सातत्याने या कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नी पाठपुरावा करत आहे.

सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, सर्व शाळांना 100% अनुदान देण्यात यावे, सातव्या वेतन आयोगाचा 3,4 थकित हप्ता त्वरित जमा करावा,2005 पूर्वी नियुक्त शिक्षक कर्मचारी यांची जीपीएफ खाती पुर्ववत सुरू करावी,इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 10,20,30, आश्वाशित प्रगती योजना शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना लागू करावी,राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागाकडून कायम वैयक्तिक मान्यता द्याव्यात

या व इतर रास्त मागण्या. घेऊन पूर्ण मराठवाडयात शुक्रवार दि 21 रोजी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर  हे आंदोलन करण्यात येणार असून या धरणे आंदोलनात परळी तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे तालुका अध्यक्ष अनुप कुसुमकर (भावसार),शहराध्यक्ष संजय गोरे,तालुका व शहर कार्यकारिणी यांनी केले आहे*

हेही वाचा..पंकजाताई मुंडेंनी शेतकरी अन् नागरिकांविषयी का ? व्यक्त केली चिंता..वाचा सविस्तर बातमी..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/parli_20.html*

मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*

*9423472426*.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या