Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

कौतुक |परळीच्या जैन हॉस्पीटलमध्ये 80 वर्षाच्या रूग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया |डॉ.कुलदिप जैन..

 आपला ई पेपर|परळी वैजनाथ


शहरात नव्याने सुरू झालेल्या जैन हॉस्पीटलमध्ये डॉ.कुलदीप जैन यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली 80 वर्षाच्या रूग्णावर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.आश्चर्य म्हणजे आठ महिन्यापुर्वी सदर रूग्णांच्या खुब्याला फ्रॅक्चर झाले होते. जन्मभुमीच्या रूग्णांची सेवा करून मानवतेचा धर्म जोपासण्यासाठी जैन बंधुने सुरू केलेले रूग्णालय शहर तथा पंचक्रोशीत गरजु रूग्णांच्यासाठी वरदान ठरत असुन यांच्या रूपाने वैद्यकिय क्षेत्रात अभ्यासु हाडाचा डॉक्टर शहराला मिळाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. 

शहरातील प्रसिद्ध उद्योगपती अशोक जैन यांचे डॉ.कुलदिप आणि डॉ.कुणाल सुपुत्र असुन पैकी कुलदिप यांनी एम.एस.आर्थो विषयात मुंबईत शिक्षण पुर्ण केले तर डॉ.कुणाल यांनी एम.एस. सर्जरीमध्ये वैद्यकिय शिक्षण घेतले. खरं तर अलीकडे उच्च शिक्षण घेतल्यानंतर नविन पिढी नाही म्हटल तरी मेट्रो शहरात जाण्यास पसंती देतात. मात्र जैन बंधुंनी मातृभुमीच्या लोकांची सेवा धर्म करण्याचे ठरून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिन्यापुर्वी शहरात जैन मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल सुरू केले. 

ज्या रूग्णालयात हाडासंबंधीच्या शस्त्रक्रिया उदा.सांधा प्रत्यारोपण, स्नायुसंबंधी आजार, फ्रॅक्चर ट्रिटमेंट, कंबरदुखी, लहान मुलांचे हाडांचे आजार, संधीवात, ढिसुळ हाडे तथा स्नायुंचे आजार यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मशिनरी इथे उपलब्ध आहे. त्यांना के.के.सोमय्या रूग्णालय मुंबई, वैद्यकिय रूग्णालय, मिरज आणि अंबाजोगाईच्या रूग्णालयातील एक वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. डॉ.कुणाल जैन यांनी सर्जरी एम.एस.केलेले असुन प्रवरा नगर आणि अंबाजोगाईच्या शासकिय रूग्णालयात शिवाय आग्रा येथे प्रशिक्षण पुर्ण केले. 


पोटाचे सर्व आजार मुळव्याध, भगंदर, कॅन्सर व इतर गाठींची शस्त्रक्रिया, गँगरीन, अंडाशय, लिंगाचे आजार, मुतखडा, अ‍ॅपेंडिक्स, पित्ताशय हार्निया, गर्भाशय किंवा जळालेल्या रूग्णांवर शस्त्रक्रिया आदी प्रकारचे उपचार या रूग्णालयातुन करण्यासाठी अत्याधुनिक वैद्यकिय मशिनरी तथा उपकरणे अवगत केलेली आहेत. दोन्ही बंधुंनी रूग्णसेवा करण्यासाठी घेतलेले व्रत या ठिकाणी दिसुन येते. वर्तमान वैद्यकिय सेवेवर अनेक आरोप होत असताना धन्वंतरीच्या दरबारात अशा तरूण डॉक्टरांनी सामाजिक जाणिव ठेवत सुरू केलेले दायित्व त्याचे कौतुक सर्वत्र होत आहे. 

शहर तथा ग्रामीण भागातुन येणार्‍या रूग्णांना जैन रूग्णालय एक प्रकारे वरदान वाटत असुन रूग्णांचा ओढा देखील वाढताना दिसतो. आमचे प्रतिनिधी राम कुलकर्णी यांनी काल रूग्णालयास भेट दिली तेव्हा 80 वर्षाच्या वृद्ध रूग्णावर हिप रिप्लेसमेंटची सर्जरी डॉ.कुलदिप यांनी यशस्वीरित्या पुर्ण केली. ज्यांना डॉ.लोहिया आणि डॉ.श्रीकांत घाडगे यांचे सहकार्य मिळाले. विशेष म्हणजे दोन तास शस्त्रक्रिया नंतर दुसर्‍याच दिवशी सदर रूग्णाला पायाने चालणे शक्य झाले. पुर्वी अशा शस्त्रक्रिया लातुर, नगर, पुणे, संभाजीनगर आदी शहरात होत असत. 

अलीकडे हाडाचे दवाखाने नाही म्हटलं तरी बीड, माजलगाव, अंबाजोगाई, परळीत देखील सुरू झाल्याने रूग्णांना फार काही लांब जाण्याची गरज नाही तितकंच खरं. खरं तर तालुका पातळीवर अशा रूग्णालयात शस्त्रक्रिया सुरू झाल्याने मोठ्या शहरात जावुन रूग्णांना होणारा आर्थिक त्रास तो देखील खर्‍या अर्थाने कमी झाला. यावेळी बोलताना जैन बंधुने सांगितले की, रूग्णसेवा हीच खर्‍या अर्थाने परमेश्वर सेवा समजुन या शहरात आम्ही आई-वडिलांच्या इच्छेखातर रूग्णालय चालु केले. आमच्या हातुन लोकांना चांगली आरोग्य सेवा घडावी हीच आमची प्रभु वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना. 

या ठिकाणी चोवीस तास अत्यावश्यक सेवा, अतिदक्षता अपघात विभाग,अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, सीआरमद्वारे शस्त्रक्रिया, लॅप्रोस्कोपी अत्याधुनिक मल्टिपोजिसन एक्स रे मशिन, जनरल वॉर्ड, ए.सी. डिलक्स रूम,व्हेंटिलेटर आणि पॅथॉलॉजी लॅब आदी चांगल्या सुविधा रूग्णालयमध्ये सुरू असल्याची माहिती जैन बंधु यांनी दिली.

*BREKINGNEWS जाणून तुमच्याही मोबाईलवर आलं का धोक्याचा इशारा देणारं नोटिफिकेशन?*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/brekingnews.html*


*रेल्वे स्थानक परिसरात हृदय हेलावून टाकणारी घटना*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_56.html*

*मोठी बातमी...*

*हेडलाईन्स न्यूज...*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*


*संतोष बारटक्के*

*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या