Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI | दादांचं, शिंदेचं, फडणवीसांचं मला ऋण व्यक्त करायचं..म्हणत धनंजय मुंडे भावूक...झाले

आपला ई पेपर | PARLI


परळीतील जनतेनं अभुतपूर्व प्रेम केलं, इथल्याच नाही जिल्ह्यातल्या जनतेनं प्रेम केलं..इथल्या प्रत्येक कुटुंबाशी माझं नातं आहे. हे नातं जो विश्‍वास आणि जे प्रेम या जनतेनं माझ्यावर केलं आहे, त्याची परतफेड मी या जन्मातही करू शकणार नाही असे भावदगार मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीच्या सभेत बोलताना म्हणाले...

हेही वाचा*महायुतीत खाते वाटपावरुन रुसवा |

महाराष्ट्राच्या राजकारणात अमित शहांची एन्ट्री होणार...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_12.html*

मंत्री म्हणून पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात आलेल्या धनंजय मुंडे यांचा परळीत भव्य नागरी सत्कार झाला. हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत वेळेची कमतरता असतांनाही धनंजय मुंडेंनी आपल्या भावनांना वाट करून दिली. 

मी परळीकरांना शब्द दिला होता की राजकीय पटलावर ज्यावेळी काही उलथा पालथी घडतील त्यावेळी परळीच्या वैद्यनाथाला विचारल्याशिवाय काही होणार नाही, आज ते सिद्ध झाले आहे. काही महिन्यापूर्वी याच मातीत मी म्हटलं होतं ‘जरा सा वक्तने साथ क्या ना दिया, लोग मेरी काबिलियत पे शक करणे लगे’ आज आपण काबिल आहोत हे मी देशाला दाखवून दिलं आहे. 

मला या जनतेची सेवा करायची हीच भावना सैदव आहे. सत्ता येत असते, जात असते पण वाईट काळात ज्यांनी मदत केली त्यांचे उपकार विसरायचे नसतात. 2010 ला विधान सभेला मी लायक असतांनाही मला विधान परिषद लढवावी लागली. त्यावेळी सभागृहात जायला दोन मतं कमी होती, ती दोन मतं मला अजीत पवारांनी दिली हे कसं विसरायचं असेही धनंजय मुंडे म्हणाले...

आता मंत्री झालोय, लोकांच्या अपेक्षा वाढल्यात, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पुर्ण करणं अवघड नसतं पण वेळ लागेल, नाराज होवू नका, विधानसभेच्या प्रचाराच्या वेळी जी जी वचनं दिली होती ती वचनं मी वर्षभरात पुर्ण करील. 

परळीच्या याच मैदानावर राज्याचे मंत्रीमंडळाला तुमच्या समोर आणेल. आपल्याला दादांचं, एकनाथ शिंदेचं, फडणवीसांचं ऋण व्यक्त करायचं आहे. 

शेवटी इतकंच सांगतो विश्‍वास ठेवा जिथं जाल तिथं मान उंच करून सांगाल, तुम्ही परळीच्या भुमितले आहात आणि तुमचा लोकप्रतिनिधी धनंजय मुंडे आहे असं काम करेल असे म्हणत धनंजय मुंडे भावूक झाले. , 

*थेट LIVE मोबाईलवर | PARLI आ.धनंजय मुंडे ची सभा..मोबाईलवर पहा..!*

*https://aplaepaper.blogspot.com/p/youtube-video-player.html*

*मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

*अजय धोकटे*
*8669119932*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या