Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शाळेतील शिपाई पदभरतीस मान्यता...द्या | हक्कासाठी भव्य धरणे आंदोलन व मोर्चा

उठ सेवका जागा हो, संघर्षाचा धागा हो..

सेवकांच्या विविध न्याय हक्कासाठी भव्य धरणे आंदोलन व मोर्चा

आपला ई पेपर | मुंबई |

महाराष्ट्र राज्यातील खासगी शाळा सेवक/ शिपाई कर्मचारी वर्गात शासनाच्या अन्यायकारक धोरणाने व निर्णयामुळे आक्रोश निर्माण झाला आहे. शिपाई / सेविकांच्या न्याय हक्क अधिकारांचे संरक्षण होण्यासाठी विविध मागण्या घेऊन मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, शिक्षक आमदार, शिक्षण आयुक्त, संचालक, उपसंचालक, यांना निवेदन देऊन सुध्दा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे.

हा अन्याय त्वरित दुर करण्याची मागणी संघटनेचे राज्याध्यक्ष रंगराव मालवीय यांनी सरकारकडे केली आहे. उठ सेवका जागा हो, संघर्षाचा धागा आहे. म्हणत धरणे आंदोलन सुरुवात झाली आहे

याविषयी सविस्तर माहिती अशी की, ११ डिसेंबर २०२० चा निर्गमित शासन निर्णय रद्द करावा, नियमित मान्यतेसह शिपाई पदभरतीस मान्यता देण्यात यावी, अनुकंपा तत्त्वावरील भरतीस विनाअट मान्यता देण्यात

यावी,शिक्षकेत्तराच्या पदभरतीमधील अनियमितता दुर करुन सेवा ज्येष्ठतेनुसार पदभरतीस मान्यता द्यावी, वेतन कुंठीतता दुर करुन कलम १.८६ प्रमाने गुणांकन करून वेतन निश्चिती १०,२०,३०, ही आश्वासित प्रगती योजना राज्य कर्मचाऱ्यांप्रमाने आम्हालाही देण्यात यावी, २००५ नंतरची जुनी पेन्शन सेवत असणाऱ्या सर्व शिपाई सेवक कर्मचारी वर्गाला लागु करण्यात यावी व इतर मागण्या घेऊन माध्यमिक खाजगी शाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रंगराव मालवीय यांच्या नेतृत्वाखाली हजारो संख्येने चतुर्थ श्रेणी कर्मचारी बांधव पावसाळी अधिवेशनात स्थळी पोहोचले असून अनेक कार्यकर्त्यांसह धन्य आंदोलनास बसले आहेत

 तरी सर्व शिपाई सेवक बांधवांनी आपल्या मागण्या मान्य करून घेण्याकरिता या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन या संघटनेचे राज्य  अध्यक्ष रंगराव मालविय ,सचिव संदीप शिंदे जळगांव, जि.अध्यक्ष रविंद ना.पाटील.नाशिक जि.अध्यक्ष सुकदेव ज.जाधव.यवतमाळ जि.सचिव विनोद शेलवटे.संभाजी नगर येथील राजेद्र रा.दाडंगे नाशिक जि.चे संघटनेचे मार्गदर्शक भाऊसाहेब बोरांडे.योगेश मुरकुटे यांनी केले आहे. 

हेही वाचा.. BEED |शाळेतील शिपायाचा डोक्यात दगड घालून खून |आरोपी फरार
https://aplaepaper.blogspot.com/2023/07/murder.html*

*CMB | दरपत्रक न लावणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर तात्काळ कारवाई करा |चंदुलाल बियाणी*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/cmb.html*

*बनावट नोटा प्रकरणात |परळी|अंबाजोगाई|तील चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_21.html*

मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या