Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बॅक्टेरिअल इन्फेक्शन |परळीत डोळ्यांच्या आजाराने अनेक कुटुंबाच्या कुटुंब ञस्त..

आपला ई पेपर 


परळी शहरासह तालुक्यात सध्या  डोळ्याच्या आजाराची साथ सुरू झाली आहे.अनेकांना डोळे लाल होणे व डोळ्यांना सुज येणे, लाल होणे, चिकट होणे व टोचत राहणे असा त्रास होत आहे. डोळ्यांच्या आजाराने पूर्ण कुटुंबाच्या कुटुंब यामध्ये बेजार झाले आहेत. यामुळे डोळ्यांच्या रुग्णांची संख्या सध्या वाढली आहे.


मानवी शरीरातील प्रत्येक अवयवाचे एक महत्त्व आहे. यापैकीच डोळे शरीरातील सर्वात महत्वाचा आणि तितकाच संवेदनशील अवयव आहे. परंतु, लोक डोळ्यांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. डोळ्यांची विशेष काळजी घेतली जात नाही. परिणामी डोळ्यांचे अनेक आजार उद्भवतात. फोन, लॅपटॉप किंवा टीव्हीसमोर जास्त आहे.

वेळ बसल्याने आपल्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, हे सर्वांनाच माहीत आहे. यामुळे डोळे दुखणे, डोळे जड होणे, डोकेदुखी, अस्पष्ट दिसू लागणे, डोळे कोरडे होणे असे अनेक त्रास होऊ शकतात. एवढेच नव्हे तर काही वेळेस आपल्याला लक्ष केंद्रित करणे कठीण होते आणि शांत झोप न लागण्याचीही समस्या उद्भवते. 

या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डोळ्यात बॅक्टेरिअल इन्फेक्शन होण्याचे प्रमाण अधिक वाढते. हा प्रकार संसर्गजन्य असल्याने एकाला इन्फेक्शन झाल्यास त्या कुटुंबातील इतरांच्या लक्षात येताच त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपाययोजना कराव्यात, असे आवाहन तज्ज्ञांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या