Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BIG NEWS |मोठा राजकीय भूकंप ...

 मोठा राजकीय भूकंप ....

परळीला कॅबिनेट मंत्री पद....




आपला ई पेपर

राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलेले आहे. माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार आणि इतर काही आमदार भाजपसोबत जाण्याच्या विचारात आहेत, अशी चर्चा सुरु होती. मात्र,आज सकाळ पासून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी काही आमदार नेत्यांची बैठक होऊन त्यांच्या समवेत असलेल्या 30 आमदारांना घेऊन अजित दादा महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन इतिहास तयार करणार अशी गोपनीय माहिती हाती आली असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का अशीच चर्चा सध्या सुरू आहे यावर लवकरच शिक्का मुहूर्त होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात एक इतिहास रचल्या जाणार...का?

  सध्याचे राजकारण पाहता येत्या काही वेळात  महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. 

राज्यातील शिंदे व फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार आपल्या काही समर्थक आमदारांसह राजभवनावर दाखल झाले आहेत. दरम्यान, अजित पवार शिंदे सरकारमध्ये सामील होणार असून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे.

अजित पवार आपला एक गट घेऊन महायुतीला मिळाले आहेत. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड केलं आहे. अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक बड्या आमदारांची बैठक सुरु होती. तब्बल चार तास ही बैठक सुरू होती. त्यानंतर अजित पवार यांचे पीए राजभवनात दाखल झाले आहे. अजित पवार उपमुख्यंमत्री पदाची शपथ घेवू शकतात. अजित पवार सरकारमध्ये सामील होण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्री पदाची शपथ घेवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीचे 30 आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. या 30 आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवार राज्यपालांना देणार आहेत.

सविस्तर बातमी थोड्या वेळात...

*ब्रेकिंग न्यूज_माझा*

*ई पेपर_Online*
*थेट शेगांव रेल्वे प्रवाशी भक्त भविकांच्या मागणीला रेल्वे प्रशासनाचे ग्रीन सिग्नल https://aplaepaper.blogspot.com/2023/03/blog-post_25.html#.ZB5iEOkx3xA.whatsapp*

*हेडलाईन्स न्यूज*
*आपला@पेपर | आपली बात |आपली बातमी | Breaking | ब्रेकिंग न्यूज |*
*https://aplaepaper.blogspot.com*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या