Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

थेट शेगांव रेल्वे प्रवाशी भक्त भविकांच्या मागणीला रेल्वे प्रशासनाचे ग्रीन सिग्नल


परळी / प्रतिनिधी 

मराठवाड्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज येथे दर्शनाला जाण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी वर्तमानपत्रांच्या माध्यमातून एक्सप्रेस रेल्वे चा थांबा शेगाव येथे करण्याची मागणी केली होती.या मागणीला रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. 


 शेगाव निवासी संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या मराठवाड्यातील भक्त भाविकांना रेल्वेने थेट शेगाव दर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे नांदेड हून अमृतसर जाणारी एक्स्प्रेस, नागपूर पुणे आणि नांदेड जम्मू तवी एक्स्प्रेसला संत गजानन महाराज शेगांव येथे थांबा मिळाला आहे.त्यामुळे मराठवाड्यातील शेगांव ला जाणारे भक्तगणांना  अकोला येथे न उतरता थेट शेगांव जाता येईल.यामुळे रेल्वे प्रवासी असलेल्या आबालवृद्ध ना फायदा होईल.दक्षिण मध्य रेल्वे

जनसंपर्क विभाग, नांदेड

प्रेस नोट क्र 418                                                  दिनांक 25.03.2023



विषय – हमसफर एक्सप्रेस  आणि अमृतसर एक्स्प्रेस ला शेगाव येथे थांबा मंजूर 


मध्य रेल्वे ने नांदेड विभागातून धावणाऱ्या हमसफर एक्सप्रेस  आणि अमृतसर एक्स्प्रेस या  दोन गाड्यांना शेगाव येथे सहा महिन्याच्या प्रायोगिक तत्वावर थांबा मंजूर केला आहे. तो पुढील प्रमाणे ---

१. गाडी क्र. 12422   अमृतसर ते हजूर साहिब नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस दिनांक 27 मार्च पासून  शेगाव येथे सायंकाळी 16.04 ला थांबेल आणि 16.05 वाजता  सुटेल.  

२. गाडी क्र. 12421   हजूर साहिब नांदेड ते अमृतसर साप्ताहिक एक्स्प्रेस  दिनांक 29  मार्च पासून   शेगाव येथे सायंकाळी 16.29 ला थांबेल आणि 16.30 वाजता सुटेल.  

३. गाडी क्र. 12752    जम्मू तावी ते हजूर साहिब नांदेड हमसफर  एक्स्प्रेस दिनांक 26 मार्च पासून   शेगाव येथे सकाळी 09.34  ला थांबेल आणि 09.35 वाजता सुटेल.  

४. गाडी क्र. 12751    हजूर साहिब नांदेड ते जम्मू तावी हमसफर एक्स्प्रेस दिनांक 31 मार्च पासून   शेगाव येथे सायंकाळी 16.29 ला थांबेल आणि 16.30 वाजता सुटेल.  


वरील दोन्ही गाड्यांना दिला गेलेला एक मिनिटांचा थांबा हा सहा महिन्या करिता प्रायोगिक तत्वावर देण्यात आला आहे.

जनसंपर्क कार्यालय, नांदेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या