Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बोगस बियाण्यांचे रॅकेट धनंजय मुंडेंच्या तक्रारीची कृषिमंत्री सत्तारांनी तात्काळ घेतली दखल..

बोगस बियाण्यांचे रॅकेट, साठेबाजी तसेच दुकानदारांच्या नफेखोरीवर तात्काळ कारवाई करण्याचे कृषी आयुक्तांना दिले निर्देश

आपला ई पेपरमुंबई 

खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बियाण्यांची राज्यभरात होत असलेली विक्री लोकप्रिय बियाण्यांची व खतांची साठेबाजी तसेच दुकानदारांकडून सुरू असलेली नफेखोरी यावर आळा घालण्याबाबत माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे


यांनी निवेदनाद्वारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे तक्रार केली होती या तक्रार ची तात्काळ दखल घेऊन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्य कृषी आयुक्तांना याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यात बोगस बियाणे ब्रँडेड कंपन्यांचे नाव वापरून विक्री केले जाण्याचे अनेक प्रकार घडत असून यावर शासनाचे नियंत्रण नाही त्याचबरोबर कापसाच्या कबड्डी तसेच सोयाबीनच्या महाबीज 71 यांसारख्या लोकप्रिय बियाण्यांची अधिकच्या व चढ्या भावाने दुकानदार विक्री करतात याद्वारे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक व सवणूक केली जात असल्याची तक्रार धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्र्यांना गुरुवारी पत्राद्वारे केली होती. 

यावर नियंत्रण मिळवण्यासाठी धडक कारवाया व धाडसत्रे राबवण्यात यावेत यासाठी अधिकची विशेष पथके नेमावीत यासह विविध उपाय योजना करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्र्यांना पत्र लिहिले होते. याची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी तात्काळ दखल घेतली आहे.

धनंजय मुंडे यांनी निवेदनात केलेल्या मागणीनुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्य कृषी आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे आता खत व बियाण्यांची विक्री सुरळीत होईल, अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या