परळी | प्रतिनिधी
परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा बसवलींग पत्रवाळे याने नीट परीक्षेत 620 गुण घेऊन यश संपादन केले त्याबद्दल त्याचा परचुंडी गावकऱ्यांच्या वतीने गुरुवार दिनांक 15 जून रोजी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
अल्पभूधारक शेतकरी देवराव पत्रवाळे यांचे चिरंजीव बसवलिंग पत्रवाळे उर्फ बंडू याने नीट परीक्षेत 620 गुण घेऊन आपला डॉ होण्याचा मार्ग मोकळा केला,अत्यंत हालखीच्या परिस्थितीस लढा देत त्याने हे यश संपादन केले. आपल्या परचुंडी गावाचा भूमिपुत्र बंडू हा डॉ होणार याचा आनंद अख्या गावाने साजरा केला.
वडील देवराव पत्रवाळे, आई महानंदा पत्रवाळे व बसवलिंग पत्रवाळे यांचा हृदय सत्कार करण्यात आला. यावेळी फेटा बांधून,शाल,श्रीफळ,पुष्पहार, पुष्पगुच्छ, पेढे भरून आनंद साजरा करण्यात आला. कार्यक्रमास सुभाष पाटील, वसंतआप्पा नावंदे,आदर्श शिक्षक अशोक नावंदे, वैजाप्पा पत्रवाळे,अजय गडदे,गणेश गडदे, सुनील नावंदे, नितीन सरांडे, वशिष्ठ महाराज रुपनर, ओंकारेश्वर पत्रवाळे, यांच्यासह तरुण वर्ग व महिला वर्ग उपस्थित होता. शंकर पत्रवाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक नावंदे सर तर आभार प्रदर्शन गणेश पत्रावळे यांनी केले.
Social Plugin