Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

निर्घृण खून | शेतात एका वृद्धाची हत्या | संशयाची सुई जावयावर...

 आपला पेपर | अंबाजोगाई

तालुक्यात केंद्रेवाडी शिवारातील शेतात एका वृद्धाचा   निर्घृण खून करण्यात आल्याची घटना आज बुधवारी रोजी सकाळी उघडकीस आली आहेदत्तात्रय रामा गायके वय ५८ रा.केंद्रेवाडी ता. अंबाजोगाई असे मयत व्यक्तीचे नाव आहे. मध्यरात्री सुमारास हा खून झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.


 


 कोणत्या कारणास्तव हा खून झाला हे अद्याप निष्पन्न झाले नसून धारूर पोलीस पुढील तपास करत आहे.शवविच्छेदनासाठी मृतदेह सध्या अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आला आहे.दत्तात्रय गायके यांच्या मुलाचे लग्न अवघ्या तीन दिवसांवर आले होते.लग्नानिमित्त त्यांच्या दोन्ही मुली आणि जावई घरी आले होते. घटनास्थळी जावयाची मोटारसायकल आढळून आली असून घटना घडल्यापासून जावई फरार असल्याने संशयाची सुई जावयावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


दरम्यान, माहिती मिळताच सपोनि विजय आटोळे यांनी उपनिरिक्षक संतोष भालेराव यांच्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज कुमावत यांनी देखील घटनास्थळी भेट देत तपासाबाबत काही सूचना केल्या. आरोपी जवळच्या नात्यातील असण्याची शक्यता सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस. अटोळे यांनी व्यक्त केली असून पुढील तपास सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या