Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत रात्रीच्या सुमारास वाटमारी 4 लाख 90 हजाराची चोरी...

आपला पेपर | परळी

शहरातील बस स्थानक रस्त्यावर सिने स्टाईल लुटमारीचा एक प्रकार घडला आहे.रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या एका इसमाच्या हातातील बॅग पाठीमागून स्कुटीवर आलेल्या अज्ञात 3 जणांनी हिसकावली व फरार झाल्याची घटना आज रोजी घडली आहे.या बॅगमध्ये 4 लाख 90 हजाराची रक्कम होती. 


परळी बाजारपेठेतील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडे नौकरीस अस म्हणून कामाला आहे. याव्यापाऱ्याच्या वसुलीचे काम करून ही रक्कम घेऊनया सिनेस्टाईल वाटमारीच्या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, फिर्यादी रमेश ज्ञानोबा पाचनकर वय 58 वर्षे रा.कडबा मार्केट परळी वै हे परळीतील एका व्यापाऱ्याकडे नोकरीस आहेत. 


या व्यापाऱ्याच्या उधारी वसुलीचे काम ते करतात. आज दि 6 रोजी रात्री ते अशीच विविध ठिकाणाहून वसुली करून रात्रीच्या सुमारास परळीत दाखल झाले. 

बस स्थानकाच्या समोरील रस्त्यावरून आझाद चौकाकडे जात असताना रस्त्याच्या कडेने ते पायी चालत होते. पाठीमागून एक स्कुटी ज्यावर तीन जण होते. या स्कुटीस्वार तिघाजणांनी वेगाने येत त्यांच्या हातातील बॅग हिसकावली व पळून गेले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या