Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून कु.मोहिनीने घेतली गरुड झेप...

 


मुंबई पोलीस दलात कु.मोहिनीची निवड| वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार          

परळी /प्रतिनिधी

मुंबई पोलीस दलात कुमारी मोहिनी सरवदे हिची निवड झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार संपन्न करण्यात आला आहे.                        

परळी शहरातील भीम नगर जगतकर गल्ली येथील कुमारी मोहिनी कैलास सरोदे हिने मुंबई पोलीस दलासाठी परीक्षा दिली असता तिची नुकतीच मुंबई पोलीस दलात नियुक्ती झाली असून तिचे या यशाबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला कुमारी मोहिनी सरवदे हिचे वडील परळी शहरातील थर्मल पावर स्टेशन येथे रोजंदारी मजूर म्हणून काम करतात त्यांची ती मुलगी असून अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून तिने यश संपादन केले आहे.


 त्याबद्दल भीमनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला असून यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे जिल्हा सचिव एडवोकेट संजय रोडे जिल्हा उपाध्यक्ष प्रसेनजित रोडे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष संदीप ताटे सामाजिक कार्यकर्ते आनंद जगतकर रवी रोडे आदी उपस्थित होते तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या