Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर पुण्यतिथी सप्ताहास आजपासून प्रारंभ...


बियाणी परिवार, दै.मराठवाडा साथी आणि वारकरी मंडळाचा उपक्रम

परळी / प्रतिनिधी

मराठवाडा साथी बियाणी परिवार व अ.भा.वारकरी मंडळाच्या विद्यामाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ज्ञानेश्वर माऊली महाराज महाराज चाकरवाडीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या 23 व्या हरिनाम सप्ताहास आज रविवार दि. 28 मे पासून प्रारंभ होत आहे. 

ह.भ.प.उत्तम महाराज मैंदवाडीकर हे ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख असून सप्ताहात भजन किर्तन प्रवचन आदी कार्यक्रम पार पडणार आहेत.या सप्ताहास आज रविवारपासून प्रारंभ होत आहे.आज सकाळी 

संपादक चंदुलाल बियाणी यांच्या हस्ते कलशपुजन करू करून कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन सतिश बियाणी, सुरज बियाणी यांच्या हस्ते  करण्यात आले. या सप्ताहास ह.भ.प. मंगेशानंद महाराज मुंडे डाबीकर,भरत महाराज जोगी,जगदीश महाराज सोनवणे,नामदेव महाराज फपाळ, जनाई महाराज कोकाटे व गोविंद महाराज मुंडे यांची किर्तने होणार आहेत.


सप्ताहाची सांगता दि.3 जून रोजी ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे. सकाळी 11 वा. हे किर्तन होईल. सप्ताहाचे सर्व कार्यक्रम वैद्यनाथ सह.औद्योगीक वसाहत, श्रीनाथ रोड परळी येथे होत असून किर्तनाची वेळ दररोज रात्री 8 ते 10 अशी आहे. दरम्यान या अंतर्गत होणाऱ्या सर्व कार्यक्रमास भाविक भक्तांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन बियाणी परिवाराच्या वतीने चंदुलाल बियाणी, सतिश बियाणी, जगदीश बियाणी तसेच मार्गदर्शक ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांनी केले आहे.

*धक्कादायक परळीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना*

*मृत्यूनंतर ही मृतदेह तब्बल तीन तास जागेवरच...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/05/blog-post_70.html*

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या