Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना | एक मृतदेह 3 तास जागेवरच...

 



परळी / प्रतिनिधी 

परळी रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर रेल्वे क्रॉसिंग पॉइंटवर बरकत नगर गेट जवळ आज सकाळी हैदराबाद औरंगाबाद रेल्वे  समोर एक व्यक्तीचा मृत्यू झाला रेल्वे पोलीस व संभाजीनगर पोलीस प्रशासन यांच्यातील हद्दवाद मुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे मृत्यूनंतरही अवहेलना होत आहे. या मृत्यू झालेल्या व्यक्तीची मृतदेह तब्बल तीन तास झाले एकाच जागेवर असून यामुळे दररोज धावणारी मिरज पॅसेंजर जागेवर उभी असून प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.


परळी रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर रेल्वे क्रॉसिंग पॉइंटवर बरकत नगर गेट जवळ आज सकाळी हैदराबाद औरंगाबाद रेल्वे  समोर एक व्यक्तीचा अपघात की घातपात अस्पष्ट असा मृत्यू झाला आहे.रेल्वे पटरीवर मयत व्यक्तीचे तुकडे पडल्यामुळे परळी मिरज पॅसेंजर रेल्वे दोन तासापासून परळी रेल्वे स्थानकावर थांबली आहे. रेल्वे प्रवासाची गैरसोय होत  असताना रेल्वे पोलीस प्रशासन गाढ झोपेत आहे का? 

मयताचा स्पॉट पंचनामा कोणी करायचा यावर वाद आणि अस्पष्टता असल्यामुळे सदरील घटना कडे पोलीस प्रशासन यांचे दुर्लक्ष होत आहे. तब्बल तीन तासापासून रेल्वे रुळावरील व्यक्तीचे मृतदेह आहे हा मृतदेह बाजूला काढत नाहीत त्यापर्यंत रेल्वे प्रवाशांना या घटनेचा अन हा त्रास सहन करावा लागत आहे अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रवेशाने दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या