Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सिंदफणा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृती परीक्षेत यशस्वी गरुडझेप

 


माजलगाव / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा  इयत्ता पाचवी आणि पुर्व माध्यमिक शिषयवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी परीक्षेत सिंदफणा पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी गरुडझेप घेऊन निकालाची परंपरा कायम ठेवली. 

सविस्तर वृत्त असे की, सिंदफणा पब्लिक स्कूल येथील विद्यार्थी अनेक उपक्रमांच्या, कलेच्या तसेच परीक्षेच्या माध्यमातून स्वतःचे व शाळेचे नाव विविध स्तरावर उंचावण्याचे काम करतात. त्याचाच एक भाग महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक स्कॉलरशिप परीक्षेत सिंदफणा पब्लिक स्कूलच्या  विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात अजून एक तूरा लावण्याचे कार्य केले. 

या शिष्यवृत्ती परीक्षेत  सिंदफणा पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज चे  विद्यार्थी प्रतिवर्षी चमकतात त्याचप्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी मध्ये ५४ विदयार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी पैकी २० विदयार्थी तर इयत्ता आठवीत ४१ विदयार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी २० विद्यार्थी अशा एकूण ४० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल सिंदफणा पब्लिक स्कूल वर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.


सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सोळंके, सचिव मंगलाताई सोळंके, समन्वयक नीला देशमुख, प्राचार्य अन्वर शेख उपप्राचार्य राहुल कदम, शेख चाँद तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Anwar म्हणाले…
Congratulations