Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भाजपला आणखी एक धक्का; शहर उपाध्यक्ष धनराज कुरील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल

 

आ.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश



परळी शहर भाजपला आणखी एक धक्का बसला असून भारतीय जनता पक्षाचे परळी शहर उपाध्यक्ष धनराज कुरील हे आज आ.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले आहे


कुरील परिवाराचे जनसंघाच्या उभारणीपासून भाजपच्या जडणघडणीत योगदान आहे. धनराज कुरील यांनी आ.धनंजय मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने परळी शहर भाजप मधील प्रमुख प्रवाहातील नेत्यांना हा धक्का मानला जात आहे. 


दरम्यान आज धनंजय मुंडे यांच्या पंढरी निवासस्थानी धनराज कुरील यांनी पक्षप्रवेश केला, आ.मुंडे यांनी धनराज यांचे स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, युवा नेते अमित केंद्रे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या