परळी आपला ई पेपर
भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा दीनदयाळ बँकेच्या मार्गदर्शक पंकजाताई मुंडे यांचा कुकडे परिवाराच्या वतीने पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ देऊन हृदय सत्कार करण्यात आला.
कुकडे परिवारासोबत पूर्वी पासूनच कौटुंबिक ऋणानुबंध आहेत या पुढे ते वृध्दिंगत होतील. संजय कुकडे यांनी दीनदयाळ बँकेचे संचालक डॉ.विवेक दंडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे असे हि पंकजाताई मुंडे यावेळी बोलताना म्हणाल्या .
या सत्कार सोहळ्यात आपले विचार मांडतांना डॉ.विवेक दंडे म्हणाले की पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दीनदयाळ बँक प्रगती शिखरावर आहे असे सांगत सामाजिक क्षेत्रात हिरारीने भाग घेणारे संजय कुकडे यांना सोबत घेऊन सामाजिक कार्य करणार असल्याचे डॉ.दंडे म्हणाले.
येथील यशश्री निवासस्थानी झालेल्या या कौटुंबिक सत्कार सोहळ्यास दीनदयाळ बँकेचे संचालक डॉ.विवेक दंडे, संचालक राजाभाऊ दहिवाळ, डॉ.हरिश्चंद्र वंगे, मनोज जब्दे, संजय कुकडे, सौ.अनिता कुकडे यांच्यासह इतर उपस्थित होते.
Social Plugin