Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत तब्बल 12 वर्षानंतर स्वर्गीय पंडितआण्णा मुंडे यांचे स्वप्न साकार



जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत आ.धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड

परळी वैजनाथ / प्रतिनिधी 

जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत आज शनिवार दि.१५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी मत्री आ. धनंजय मुंडे यांनी आश्रयदाता सभासद गटातून उमेदवारी अर्ज दाखल असता त्यांच्या विरोधात एकही अर्ज आला नसल्याने आ. धनंजय मुंडे बिनविरोध निवड झाली आहे. तसेच इतर जागेवर तडजोडीचे राजकारण सर्वपक्षाकडून केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवाहर एजयकेशन सोसायटीची निवडूनक बिनविरोध होण्याची दाट शक्यता झाली आहे. 

         परळी शहरातील नावाजलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या संचालक पदी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची निवड व्हावी असे स्वप्न स्वर्गीय पंडितआण्णा मुंडे यांचे होते अखेर 12 वर्षानंतर ते स्वप्न साकार होत आहे नुकतीच निवडणुक जाहिर झाली.

निवडणुक अधिकारी द.ल.सावंत यांनी 34 जागेसाठी निवडणुक कार्यक्रम जाहिर केला.दि.6 मे रोजी निवडणुक तर 7 मे रोजी निकाल जाहिर होणार आहे. या शिक्षण संस्थेची निवडणुक घेण्यात यावी यासाठी माजी मंत्री आ.धनंजय मुंडे व प्रा. सदाशिव मुंडे, पंडितराव दौड, उत्तमराव देशमुख, भास्कर मामा चाटे,कुंडलिकराव मुंडे, डॉ. पी. एल. कराड, सुरेश (नाना) फड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदिप खाडे यांनी न्यायालयीन लढा लढल्यानंतर धर्मादाय उपायुक्त यांनी 31 मे पर्यंत निवडणुक घेण्याचे आदेश दिले होते.  त्यानुसार शनिवारी दि.१५ एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वैद्यनाथ विकास पॅनलचे उमेदवार आ.धनंजय मुंडे यांचा आश्रयदाता सभासद मध्ये अर्ज दाखल करण्यात आला. त्यांच्या जागी एकमेव अर्ज आल्यामुळे आ. धनंजय मुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. वैद्यनाथ विकास पॅनलचे एकूण सर्व जागेवर अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तसेच दुसऱ्या जागेसाठीही एकूण १०२ अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुक अधिकारी द.ल.सावंत यांनी सर्व कामकाज पाहत आहेत.

live थेट.. परळीत मोबाईलवर लाईव्ह..बघा ! भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती स्पशेल सर्व मिरवणूक

👇👇👇👇👇
https://www.youtube.com/live/_E9Dh1nDU7g?feature=share

*संतोष बारटक्के*  *9423472426*