Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अपघात | उड्डाणपूलावरील अपघातात एकाचा जागीच मृत्यू ; एक जण गंभीर


परळी / प्रतिनिधी

परळी येथील शामाप्रसाद मुखर्जी उड्डाण हा सध्या अवजड वाहन व अवैद्य वाहतुकीने उड्डाण पुलावर धुमाकूळ घातल्यामुळे बेशिस्त वाहतुकीमुळे अपघात वाढले आहेत. या पुलावर नुकताच मोटरसायकल व अटोच्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जख्मी झाल्याची घटना आज दि 25 रोजी दुपारी 4 च्या सुमारास घडली आहे.




परळीतील इटके कॉर्नरकडुन उड्डाण पुलाच्या दिशेने मौजे डाबी येथील संपती बाबु पारवे, निकम केरबा इंगळे हे दोन युवक मोटारसायकल वरुन जात असताना उड्डाण पुलावरून  अचानक एक ॲटोने मोटरसायकल स्वराला जोराची धडक दिल्याने मोटार सायकल वरील संपती भरत पारवे वय 26 हा एक युवक जागीच ठार झाला. त्या अपघातातील दुसरा युवक निकम केरबा इंगळे यांच्यावर परळी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असुन तो ही गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

मयत युवकाचे शवविच्छेदन परळी उपजिल्हा रुग्णालय करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळतात संभाजी नगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पुढील तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या