Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांची परळी उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट







सर्व विभागाचा घेतला आढावा


परळी / प्रतिनिधी


बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची जिल्ह्यातील विविध विभागांना अचानकपणे भेटी देणं सुरू आहे याचाच एक भाग म्हणून त्यांनी परळी येथील उपजिल्हा रुग्णालयास आज दि 23 रोजी सकाळी 10 वाजता अचानक पणे भेट दिली.


यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या ओपीडी, वार्ड, अतिदक्षता विभाग, शस्ञक्रिया विभागासह प्रत्येक विभागाची यावेळी जिल्हाधिकारी दीपा मधोळ यांनी पाहणी केली. दरम्यान जिल्हाधिकारी मॅडम यांनी स्वच्छते बाबत अधिक लक्ष द्या अश्या सुचना दिल्या. ब-याच दिवसापासुन सीबीसी तपासणी बाहेरून करावी लागत होती संबधित आरोग्य विभागाला लागलीच सुचना करुन सीबीसी सेल मशीन तात्काळ मशीन उपलब्ध होणार आहे.


बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर सह पोलीस निरीक्षक सुरेश चाटे हे उपस्थित होते.


यावेळी आरोग्य विभागाचे डॉ. अरुण गुट्टे, डॉ दिनेश कुरमे, डॉ. नाथराव फड, डॉ. वैशाली गंजेवार, डॉ, तिडके, आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या