Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

9.5 कोटीं रुपयांची वसुली नांदेड रेल्वे विभागाचे उल्लेखनीय कामगिरीबद्दल केले कौतुक





नांदेड / प्रतिनिधी
नांदेड रेल्वे विभागात तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात 1.73 लाख केसेस मधून (विनातिकीट / अयोग्य तिकिट) 9.5  कोटीं रुपयांची वसुली केली आहे, तिकीट तपासणीमधील नांदेड विभागाची ही आतापर्यंतची सर्वाधिक वसुली आहे.

रेल्वेत तिकीट विरहित प्रवास आणि अनियमित प्रवासाला अटकाव करण्यात तिकीट तपासणी महत्त्वाची भूमिका बजावते आणि विनातिकीट प्रवाशांवर  प्रतिबंधक प्रभाव म्हणून काम करते. तसेच तिकीट तपासणी मुळे रेल्वेच्या बुकिंग विंडो विक्रीत वाढ होण्याचा मार्ग मोकळा होतो.

या 2022-2023 या वर्षात नांदेड रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी 75 विशेष तिकीट तपासणी मोहीम तर दक्षिण मध्य रेल्वे च्या मुख्यालायीन अधिकार्यांनी नांदेड विभागात 02 तिकीट तपासणी मोहीम राबविल्या.   
ज्यात श्री नागेंद्र प्रसाद, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड यांच्या नेतृत्वात दि 3 मार्च रोजी एकाच दिवसात 5.58 लाख रुपयांची वसुली केली गेली,जी नांदेड विभागातील आज पर्यंतची सर्वाधिक आहे.

तिकीट तपासणी कर्मचार्यांच्या अथक परिश्रमांसह तिकीट वेंडिंग मशीनद्वारे तिकीट काढण्यात सुलभता आणि UTS ON MOBILE अॅपचा प्रसार इत्यादी उपायांमुळे रेल्वेला प्रवासी व्यवसायातील कमाई सुधारण्यास मदत झाली आहे.
श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी तिकीट तपासणी कर्मचार्यांचच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले.विना तिकिट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी संपूर्ण वाणिज्य शाखेचे अभिनंदन केले. श्रीमती सरकार  यांनी सांगितले की तिकीट तपासणी ही एक महत्त्वाची यंत्रणा आहे जी ट्रेनमधील अनधिकृत प्रवास कमी करण्यास मदत करते आणि नियमित  रेल्वे प्रवाशांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते. तिने सर्व रेल्वे प्रवाशांना वैध रेल्वे तिकीट आणि ट्रॅव्हल ऑथॉरिटीसह प्रवास करण्याचे आवाहन केले.अशी माहिती जनसंपर्क कार्यालय, नांदेड यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या