Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड जिल्हाधिकारी म्हणून दिपाताई मुधोळ (मुंडे) यांची नियुक्ती


बीडच्या इतिहासात प्रथमच मिळाल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी 


 » आपला ई पेपर /बीड 

बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची बदली करण्यात आली असून बीडला जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती दिपाताई मुधोळ / मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या दिपाताई मुधोळ या सिडकोच्या प्रशासक असून त्यांची बीड जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली असून राधाबिनोद शर्मा यांना सिडको औरंगाबादचे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या बदलीच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती 

आता अखेर त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर दिपाताई मुधोळ / मुंडे यांची नियुक्ती बुधवारी करण्यात आली आहे. दिपाताई मुधोळ / मुंडे या 2011 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या